दृष्टी आडच्या सृष्टींत | Drishti Aadchyaa Srishtint

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : दृष्टी आडच्या सृष्टींत  - Drishti Aadchyaa Srishtint

More Information About Author :

No Information available about श्यामा - Shyama

Add Infomation AboutShyama

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे दृष्टीआडच्या सृष्टीत धर्मांतल्या एका बाईशीं सहज बोलं शकलें नाही. सहज प्रदन विचा- रायचे म्हणून सुरुवात केली. “ बाई, किती महिन्यांचें मूल ? “ “ असल बाई ५-६ महिन्याचं.” झालें, तिचें माझें भाषण सहज युरू झालें. खरोखर लहान मूल म्हणजे कोणत्याही दोन स्त्रीहृदयांना “ांधणारा एक दुवाच आहे. कोणत्याही बाईपाशीं मूल अस्‌ द्या. तुमची तिची १५ मिनिटांच्या आंत गट्टी जमेल. तिचें माझें भाषण चाल होतेंच. रस्त्याने मधून मधून ओढया- बरून धुणे धुवून येणाऱ्या बायका जात येत होत्या. आम्हांला तिथे बसलेल्या पाहिल्या की थबकून त्या तिथे थांबत. त्यांच्या चेहऱ्यावरचें तें कुतूहल, विदोषतः: नवीन पाहिल्याबरोबर कोणत्याही तऱ्हेने न लाजतां अगदी डोळे लावून पाहण्याची ती पद्धति, साऱ्याची कशी मला मजा वाटली. त्यांच्या उभे राहण्याच्या पद्धतींत तरी किती स्वाभाविक डोलदारपणा होता ! डोक्यावर धृणें घेऊन गुडघ्यापर्यंत लृगर्डे खोवून तोंडांत बोटें घालून अभावितपणें उभी राहणारी एक पोरगी तर मला फारच आवडली. मी तिला विचारलें, “काय ग तुझें नांव? “” पण ती काय म्हणून उत्तर देईल ? तिने मान फिरवली नी पुढे चालती झाली. जातां जातां मागे वळून पाहत होती. पण माझ्या प्रदनाला उत्तर देण्याकरितां खास नव्टे. झालें, आभ्ही आल्याची बातमी किती तरी चटकन येथे पसरली. एक ' साहेबीण ' आणि एक बाई आली आहे. एवढीशी गोष्ट त्या वस्तींत खळबळ उडवायला अगदी पुरेशी होती. मिस रोझ तोडक्या मोडक्या मराठींत त्या म्हातारीशीं बोलत असतां मी इकडे तिकडे पाहत होतें. झोपड्यांच्या पुढच्या अंगणांत कोणी बायका पोरें घेऊन येऊन बसल्या, कोणी तेलफणी घेऊन केस विचरीत दारापुढे बसून राहिल्या, कोणीं दगडाजवळ भांडीं घासायला सुरवात केली. थोडक्यांत, दुपारच्या वेळीं त्या वस्तींत जेवढ्या बायका जमणें शक्य आहे तेवढा सार्‍या निरनिराळा निमित्ताने आपल्या झोपडीबाहेर येऊन उभ्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now