छाया - प्रकाश | Chhaayaa Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chhaayaa Prakaash by गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar

More Information About Author :

No Information available about गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar

Add Infomation AboutGopinath Talvalkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दोन शब्द या कादंबरीची कल्पना आणि आराखडा आज दोन वर्षे मनांत घोळत होता; परंतु प्रत्यक्ष लेखनास ता. २६-७-३६ रोजीं सुरुवात झाली. पण पांच प्रकरणें लिहून झाल्यावर लेखनाला अर्धविराम मिळाला. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यांत लेखनास पुनः सुरुवात केली आणि मग मात्र दोन अडीच महि- न्यांतच कादंबरी लिहून हातावेगळी केली. “अर्वाचीन साहित्य * या ग्रंथांत आणि ध्रुव”, “विहार”, “संजीवनी”, “प्रकाश १ इ० नियतकालिकांत या कादंबरीच्या प्रकाद्नाबद्दलच्या वार्ता प्रसिद्ध होत गेल्याने, लेखनास एक प्रकारें हुरूप आला हे कृतज्ञतापूर्वक नमूद करावेंसें वाटतें. कादंबरीच्या रचनाकालांत आणि नंतर, तिच्या सहृदय नांवाचे हिंदी व मराठी १-२ बोलपट निघाले. अर्थात्‌ त्यांचा कादंबरीशीं नांवापुरताहि संबंध नाहीं हें उघड आहे ! सिनेमाप्रमाणें कांहीं ठळक प्रसंगांचें विस्तृत वर्णन देऊन, त्यांतून कथा- नकाचें सूत्र औंवावयाचें असें एक विशिष्ट तंत्र या कादंबरीत उपयोगांत आणिलेलें दिसेल. एकाद्या घटनेंत कथानकाचा विकास होईल, दुसऱ्या प्रसं- गांत वातावरणाची कल्पना येईल, आणि तिसऱ्या एकाद्या हकीकतींत पात्रांचे स्वभावविश्षेषच स्पष्ट होतील. या दृष्टीनें पाहिलें म्हणजे कांहीं प्रकरणांत बाह्यतः दिसणारा अलगपणा नाहींसा होऊन, सर्व कादंबरीत एक प्रकारचा अखंडपणा आहे हें कळून येण्यासारखें आहे. कुठें कुठें कला व तत्त्वज्ञान यांचीहि चरची आहे. भौतिकवादी दृष्टीचा प्रचार व प्रसार सध्यांच्या शास्त्रीय युगांत सर्वत्र होतांना दिसला, तरी कांहीं श्रेष्ठता, ध्येयें, गुणविशेष असे असणारच कीं, जेर्थे अध्यात्म व भौतिकता यांचें मीलन व्हावें. त्या मीलनाचा महोत्सव चितारणें हें कलेचें पवित्र कर्तव्य होय. मीं ते कितपत पार पाडलें आहे हें रसिक वाचक ठरवितीलच. “ तुम्ही लिहा हो कादंबरी; छान लिहाल तुम्ही. ? अशा उत्साहवर्धक शब्दांनी प्रि. बाबूराव अत्रे यांनीं कादंबरीलेखनास मला प्रवृत्त केलें; आणि बॅ. विठ्ठलराव




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now