एकादशी | Ekaadashi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
121
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)एके दिवशी आह वीला बरोश्रर घेऊन मी बॅकबेवर फिरायला गेलों
होतों. तो सहसा घरांतून बाहेर निघत नसे. कुणी ओळखीची माणसं भेटतील
या भीतीनंच तो बाहेर जायचं टाळतो असा माझा समज झाला होता.
आणि त्या दिवशीं झालंही तसंच. आम्हीं बॅकबेवर जायला आणि
समोरूनच मलवार हिलेवरचे फॅंदानेबल चिनी समोरून यायला एकच गांठ
पडली, त्यांना पहातांच त्याच्या कपाळ.ला आठ्या पडल्या. त्यांना चुकवण्या-
साठीं तो माझा हात घरून आदम मागं वळूं लागला. तितकक््यांत त्यांनी
झपाझप प्रावलं उचलीत य्रेऊन आम्हांला गांटलं.
आह वीला पाहतांच त्यांनी अत्यंत आदरानं लवून प्रमाण केला. चिनी
भाषेत त्यांचं बोलण सुरु झालं. आह वी शक्य तितकं बोलायचं टाळीत होता.
बोलणं माझ्यासंबंधीं असावं असंच मला वाटलं. कारण बोलत असतांना वडील
माणसांना बिलगणाऱ्या एखाद्या छहान मुलाप्रमाणें तो मला बिलगत होता.
कदाचित ते आपल्याला ओढून नेतील अशी जणु काय त्याला भीति वाटत होती.
ते सारे चिनी बहुभ्वा तरुणच होते. तिघे पुरुष, दोन तरुणी आणि दोन
मुली होत्या. सर्वांचा पोषाख अगदी अस्सल इंग्रजी थाटाचा होता. त्या
तरुणींनीं तर॒शॉट्स घातव्या होत्या.
त्यांतला सवात वडील दिसगारा तरुग माझ्याकडे वळून अगदीं विशुद्ध
इंग्रजींत मला धन्यवाद देऊं लागला. आह वीची मी माहिती विचारली तेव्हां
तो म्हणाला, *“चिनांत आह वीचा दर्जी फार मोठा आहे. तो मोठा तत्त्ववेत्ता
आहे. सर्व धमाचा तौलनिक अभ्यास करून त्यानं चिनी भाषेंत मोठमोठे ग्रंथ
लिहिले आहेत---?'
ते त्याला आपल्यावरोबर घेऊन जाण्यासाठीं फार आग्रह करीत असावेत
अस मला वाटलं. पण घाईघाईनं त्यांना प्रणाम करून माझा हात धरून तो
पुढं सटकला. ते बरेच दूर जाईपर्यंत तो एक शब्दही बोलला नाहीं. ते बरेच
दुर॒गेलेसे पाहून मग तो मला म्हणाला, “मला आवडत नाहीं तें हेंच, देशासाठीं
आम्हीं झगडतों. आहों, लाखा माणसांचं रक्त सांडतं आहे, त्या आमच्या
लढाईसाठीं सैनिकांनीं पोषाख बदलले तर मला त्याचं कांहीं वाटत नाहीं.
लढाईसाठी तशा पोष्ाखाची जरूरी असेल, पण या घरगुती लोकांनीं आपले
User Reviews
No Reviews | Add Yours...