बहकळेळी - ब्रह्मचारी | Bahakalelii Brahmachaarii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bahakalelii Brahmachaarii by माधवराव कामत - Madhavrav Kamat

More Information About Author :

No Information available about माधवराव कामत - Madhavrav Kamat

Add Infomation AboutMadhavrav Kamat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ अंक पहिला. पंद्याः--महाराज, मी संसाराला कंटाळलो आहे. कुलाच नांव नामदोप होऊ नये म्हणून संसारांत पडलॉ, पण आतां संसाराचं नांव घेतलं, तर नांवानिश्ी संसारातून निसटून जावं असं वाटूं लागतं. दोन हाताचे चार हात करून चतुर्भूज झालों, पण घरच्या अष्टभूजा देवीच्या गर्जनपुढं सहस्रार्जुनाची देखील दाणादाण झाल्याशिवाय राहणार नाहीं. तेव्हां गरोजची तोडातांडी होऊन, संन्याशाचा संसार करण्यापेक्षा संसाराचा संन्यास घेऊन परब्रम्हस्वरूप गांठण्याचा मी निश्चय कला आहे. त्रिदंडी संन्यास घेणं म्हणजे स्मशान वैराग्यासारखं होईल. म्हणून याच पावलीं संन्यास घेण्याची माझी तयारी आहे. नारदः--ठीक आहे. काहीं दिवस संसारात राहूनच मन समाधिस्थ करण्याचा प्रयत्न कर. तेवढी मनाची तयारी झाल्यावर, निर्जन अरण्यात देखी र समाधीशी एकजीव होणं तुला कठीण वाटणार नाही. मग गुरुची गरत सुद्धां तुला भासणार नाहीं. पेंद्या, मी वुला संन्याशाची दिक्षा दिली, पण तं मला संसाराची दिक्षा कधी देणार * पंद्याः--म्हणज ! नारद:--मला संसारी व्हायचं आहे. लग्न करून संसार थाटायचा आहे. पंद्याः--काय संसारी व्हायचं आहे १ नका महाराज, संसारी होऊं नका. संसारी होणं म्हणजंच सुखाचा जीव दुःखांत घालण्यासारखा आहे. नारदः---पेद्या, दुःखाशिवाय सुखाला गोडी नाहीं. चॅद्याः--कुणी सांगितलं तुम्हांला संसारांत सुख आहे म्हणून ! नारदः--संसारात सुख नसतं तर सृष्टीचा परिवार बाढला नसता. मी त एकमेकांना दिसला नसता. चॅद्याः--नारदमुनी, मलाही एकेकाळी संसार सुखाचा वाटत होता. संसारी झाल्यावर जिवाचं सार्थक होईल अशीं सुखस्वप्नं पडत होतीं. पण श्रांड्याच काळात संसाराचा परिवार वाढून, पोरांचं लटांबर पांठीमागं लागलं, वायकोपोरानीं जीव नकोसा केला म्हणूनच मला संसाराचा वीट आला. मला तुम्हीं गुरु मानतां, तर गुरुची आजा म्हणून तरी संसारी हीऊं नका.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now