नवनीत भारत | Navanit Bhaarat
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
234
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आदिपवे
महाभारत हा भारताय वाड्ययांतला प्रधान ग्रंथ आहे. त्याला समुद्राचीच
उपमा शोभेल. कोरव-पांडवांचा इतिहास हा त्याचा मुख्य भाग. शिवाय
अनेक आख्याने-उपाख्याने यांच्या नद्या त्याला येऊन मिळाल्या आहेत.
भगवान् वेदव्यासांनी हा स्चला. यांचीं अठरा पर्वे आहेत. प्रत्येक पर्वे
आपापल्यापरी रसाळ आहे. मानवी स्वभावाचे अनेक नमुने आणि त्यांचे
संघष यांत आढळतात. प्रचलित कथेला धरून राजकारण, समाजकारण,
तत्त्वज्ञान, घर्म यांची अंगोपांगांनी यांत चचा केलेली आहे. लहान लहान
कथांच्या द्वारे नीतितत्त्वे मनावर बिंबवलेलीं आहेत. म।नव आणि दानव,
देव आणि गंधर्व, ब्रह्मारपे आणि देवार्प, नाग आणि पन्नग; या सवाचा
संबंध यांत आलेला आहे आणि त्यामुळं हा ग्रंथ उत्तूंग भाणि विशाल झाला
आहे. या ग्रंथामुळेच * व्यासोच्छिष्टं जगत्तर्वम् ? अशी म्हण पडली. कारण
यांत व्यासांची दिव्य प्रातेभा सर्व विषयांना स्पर्श करून गेली आहे. “जे
भारतांत आहे तेच इतर सगळीकडे आहे आणि जे भारतांत नाहीं ते कुठेच
आढळायच नाही? अशी याची ख्याते आहे. या ग्रंथामुळे भारतीय वाड्ययाला
तेज आलल. या ग्रंथामुळेंच भारतीय संस्कृतीचा सर्वांगीण विकास आणि
मोठेपणा जगाच्या निदर्शनाला आला. विश्वाला वंद्य झालेली भगवदगीता
याच महाभारतांत आहे. भारत हद अठरा पाकळ्यांचे कमल आणि गीता हा
त्यांतला मकरंद अस श्रीज्ञानेश्वर म्हणतात.
असा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथराज संतवाणीच्या आधांरे पण थोडक्यांत निवेदन
करावयाचा आहे. यांत वाचकांना भारतीय कथेबरोबरच महाराष्ट्रसंतांच्या
रसाळ काव्याचाहि आस्वाद मिळावा असा दुहेरी उद्देश मनांत धरलेला
आहे. तो उद्देश सिद्धीला जावा म्हणून प्रथामारंभी मुक्तेश्वरांच्या रसवतीने
मंगलाचरण करतो.
User Reviews
No Reviews | Add Yours...