पंधरा आगस्ट | Pandharaa Aagasta

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pandharaa Aagasta by मधुसुदन काळेळकर - Madhusudan Kalelakar

More Information About Author :

No Information available about मधुसुदन काळेळकर - Madhusudan Kalelakar

Add Infomation AboutMadhusudan Kalelakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
काळ १--१४ ऑगष्ट १९४७ ची रात्र. ११-३० चा सुमार आहे. पडदा वर जातो त्यावेळीं दिवाणखान्यांत कुणीहि नसतं. दिवाणखान्यांत पूर्ण प्रकाद असून, गॅलरीच्या कठड्यावर रोषणाई केलेली आहे. गॅलरीतून घोषणा ऐकूं यत आहेत. “आझाद हिंद जिंदाबाद,” “ महात्मागांधी जिंदाबाद”? वगैरे घोषणा पहिल्यानें जवळून व नंतर लांबून कानीं येतात. गलरींत अन्वर-मिझौ चचांचा मुलगा कसला तरी व्यायाम करीत असतो. अजून पंचवीशींत आहे स्वारी ! याला पाहिल्यावर याचे एक वैशिष्ट्य डोळ्यांत भरतं अन्‌ तें म्हणजे हा बुटका आहे. बुटकी माणसें दुष्ट अगर कावेबाज असतात म्हणे. पण त्याला हा अपवाद आहे ! हा भोळा आहे. प्रेमळ आहे. पंचविशीत प्रवेश केल्यामुळें त्याला प्रेमाची ओढ लागली आहे. पणे बुटक्या माणसावर कुठलीही सुलगी प्रेम करुं शकत नाहीं हा त्याचा न्युनगंड आहे. आपल्या बुटकेपणामुळे आपल्या उत्कषाच्या सर्व बाटा खुंटल्या आहेत असं त्याचं प्रामाणिक मत आहे. त्यासुळ स्वारी बरेचवेळां स्वतःवरच बिनसलेली असते. आजही तीच अवत्या आहे. स्वतःच्या बुटकेपणावर तो कधीं नाहीं इतका आज रागावलेला आहे. असं त्याच्या हातवाऱ्यावरून दिसून येतं. तोंच आपसांत कांट्रींतरी कुजबुजत सुमताज ब रोषन प्रवेशा करतात. त्यांच्या एकंदर आवि्भावावरून कसला तरी आनंद त्यांना झालेला दिसत आहे. त्यांचे अन्वरच्या व्यायामाकडे लक्ष नसतं. आपल्या पर्सेस ड्रेसींग टेबलावर ठेवून त्या कोचावर अंग टाकून देतात. मुमताज ही मिझो चचांच्या वाकट्या भावाची मुलगी. बय बर्ष २२. कॅलेजांत असते. तिर्म सलवार व झब्बा घातला असून खांद्यावरून ओढणी घेतली आहे. ही स्वभावाने श्रमळ व अत्यंत लाघवी आहें. तिच्या डोळ्यावरून ती कुणावरतरी उत्कट प्रेस करीत असावी असा संशय येतो. रोशन ही मिर्झा 'चचांची पाळलेली मुलगी. लहानपणापासून ही चचांकडेच आहे. ही सुंदर नसली तरी आकर्षक आहे. हिनेट्टी मुमताजप्रमाणें पोषाख केला आहे. ही विशेष शिकलेली नाहीं. पण हजरजब्राबीपणांत कुणालाही हार जाणार नाही. हीचा स्वभाव प्रेमळ असला तरीं फटकळ आहे. रुसण्यांत तर हीचा हातखंडा. प्रियकराशीं सदैव भांडत राहणे ही हिच्या प्रेमाची कल्पना, फटकळपणा वजा केला तर ही एक लाग्ब थोरगी आहे. ]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now