काजवे | Kaajave

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaajave by शंकर साठे - Shankar saathe

More Information About Author :

No Information available about शंकर साठे - Shankar saathe

Add Infomation AboutShankar saathe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
काजवे ७ घालतांच माझ्या डोळ्यांना आमच्या घरामागच्या फणसाचा तो भव्य वृक्ष एकदम दिसूं लागला. एकदां वाटलें कीं त्या लेगोटीयार दोस्तानें बरींच वर्षे न भेटल्यामुळें या पाकळीपाकळीवर स्वदस्तुरचें स्मृति पत्र लिहून माझेकडे पाठविलें असावें. त्याची आठवण म्हणजे बाल्यांतील अनेक हूड, खोडकर कृत्यांची आठवणच ती ! लहान मुलाने प्रेमळ दादाच्या कटीखांद्यावर चढून त्याची शेंडी पकडावी त्याप्रमाणें वडील माणसांचा डोळा चुकवून अनेक युक्त्याप्रयुक्त्या योजून आमचा बाळ- गोपाळांचा कळप या फणसाच्या वक्र बाहूबर चढावयाचा, वर * हूप हूप ! करून गर्जना करणाऱ्या इुप्प्यांना मुसळ दाखवून पळवून सोडावयाचा व दादाच्या खिशांतील चाकोलेट खाणाऱ्या लहान भावा- प्रमाणें फणस---दादाच्या हातांतील चांगले पिकळेले फणस काढून झाडावरच्या झाडावर फन्ना पाडावयाचा व जीं छोटीं मानवी मक्कटे “* मालाउदे55' करून खालीं तोंड वेंगाडत असावयाची त्यांवर कचित आठळा तर कचित गरे फेकून त्यानां “यांव याव १ माकडा आम्ही खाऊं गरे, आठळांनीं तुमचा तोबरा भरे १ या काव्यमय वाणीत वेडवावयाचा. या, या सवस्मृती आज जसजशा डोन्यांपुहून जाऊं लागल्या तसतशा आधुनिक जीवनाच्या पाकळ्या गळून हुरहुरीचें बोट मात्र चावले गेले. छहानपण दे गा देवा म्हणून-बाल्य लाभते तर तें आम्हीं केव्हांच मिळविले असतें. पण गेढें ग्राल्य परत लाभणे नाहीं म्हणूनच पूव स्मृती ही अमृत सरिता वाटूं छागते. व जोंबर ही स्मृती ताजी तोंबर सांप्रतच्या रुक्ष जीवनाचा विसर. पण या पूर्व स्पृतीची निर्विकल्प नव्हे तर साविकल्प समाधी सदा कुठची लाभायला !१ आणि म्हणूनच घडीभर लाभलेली पूत्रे स्मृती हीच आनंदमया घटिका होते. तुमचा नाहीं का असा अल्ुभव !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now