कमळण | Kamalan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कमळण - Kamalan

More Information About Author :

No Information available about अरविंद गोखळे - Arvind Gokhale

Add Infomation AboutArvind Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कमळण ७ त्याच्याशीं विलास करणे--हें सारं कां १--अन त्या संध्याकाळीं वादळाचे निमित्त करून त्याला बिलगणं, लाजणे, सर्वस्व देणे, हें तरी कुणाचं कृत्य * कमळा खिन्नपणे, द्यून्यपणें बसून राहिली. दांतओोठ खाण्यांत अर्थ नव्हता; अश्र टाळण्यांतहि नव्हता. अपूर्वता, उत्कटता असेल तरच आठ्यांना अगर अश्रूंना मोल! इथं कुणीं कुणासाठीं रडारागवायचं १--फुसक्‍्या भावनेवर बांधलेला डोलारा हा. त्यांत हृदयांतल्या ठुफानाला कुठल्य वाव १ कमळा तशीच मख्खपणें, मुर्दाडपणें बसून राहिली. कुठें तरी घड्याळांत एकामागून एक ठोके पडले व कमळा भानावर आली. तिला वाटलं, श्रीकांतचे बूट वाजले. तो आला. आवेगानं तिल्य जवळ घेऊं लागला. हा मागू लागला. सिनेमाची तिकिटे देऊं लागला. दोघ्रजणं एकमेकांचे लाड करू लागलीं. इतरांच्या संसाराची य्वाळी करू लागलीं. एकमेकांच्या प्रगाद प्रेमाबद्दल. . . दळणाऱ्या पदराखाळीं छाती घडघडळी आणि कमळा दचकून उठली. श्रीकांत आला नव्हता. अजून प्रेमाची, स्त्रगांची भाषा सुरू झाली नव्हती. पण लवकरच तो येईल. लवकरच नायक सुरू होईल. कमळेला वाटलं, नको तो नकलीपणा ! किती दिवस ही सारवासारव करायची, स्वतःची फसवणूक करायची १- -अजाण तारुण्याच्या उन्मादांत सुरू झालेली ती संध्याकाळ आतां संपलेली बरी नाहीं का १ आपल्या संसाराचा पाया, पूर्वेतिहास पुन्हा एकवार डोळ्यापुढे उभा राहिला नि तिला कसंसंच झाले, किळस आली. स्वेटर, फोये, पेन, टेबलाचा खण, भांड्यांच्या उतरंडी व वर गेलेली मच्छराणी तिच्यापासून दूर जाऊं लागली, अंधुक होऊं लागली. तिला वाटले, आपणच' दूर व्हावं. श्रीकांत येण्याआाशीं अहक्य व्हावं. त्याच्या मिटीं- तून मोकळं व्हायला, त्या झाडाच्या सावलींतून सुटायला ती धडपटूं लागली. कमळा बिर्‍्हाडाब्राहेर आठी. दाराला कुलूप लावतांना तिच हदय घडघडलं. इतक्या आत्मीयतेनं मांडलेला जोडलेला संसार सोडण्यासारखा खुळेपणा दुसरा नव्हता. आपल्याला वेड लागले आहे कीं काय अशी तिची तिलाच शंका आली. ती तशीच कुलपाजवळ घुटमळली. पण एक्टां बंद केलेले दार परत उघडायचा तिचा धीर झाल्य नाहीं. एका अलछड मुलीनं एका भोळसट मुलाशीं किरकोळ प्रणय केला; आणि मग त्या मृखपणाला आपल्या संभावित खूपास साजेसं नांव द्यायची केविल- वाणी घडपड केली. तें नांव म्हणजेच अपूर्व, अमर प्रेम ! तो खेळ म्हणजेच हें बिऱ्हाड !--ह्या बिऱ्हाडांत कमळेनं परत प्रवेश्य करायचा ? एकदां सत्य समजल्यावर ? खोस्याचा त्याग करायचं ठरवल्यावर १




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now