पारध | Paaradh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पारध  - Paaradh

More Information About Author :

No Information available about माळती बेडेकर - Maalti Bedekar

Add Infomation AboutMaalti Bedekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मला कुणाचा आधार असता, तर मला ज्या घरीं वेरलंत तेथून कशाला आलें असतें तुझ्या घरीं ! आहे : रमा, मी तरी बोलले म्हणजे काय तुला दुगाव म्हणून का ! रमा : आई, मला सगळं ठाऊक आहे. जगांत कुणी कुणाचं नाहीं. माया, प्रेम, आदर, मान, सगळं कांहीं पैशांत मिळतं अन्‌ पशांनीं मिळतं. आई काय, ब्राप काय, भाऊ काय नि सासरचीं माणसं काय--सगळ्यांचं प्रेम पैशांवर, कष्टाला जगांत कांहीं किंमत असती, तर सासूनं अन्‌ नवऱ्यानं पावलागणिक कां लाथाडली असती मला १ तुझ्या मनांत नसेल कदाचित्‌ मला दुखवायचं. पण ठुमच्या वागण्यांत अन्‌ शब्दांत जे दिसलं, तेव्हांच ठरवलं, कुणी कुणाचं नाहीं; आपलं आपण पाहिलं पाहिजे. आईे : हो, हे बरीक खरं. तुझंच तूं पहातेस. आतां एवढी मी तुला माझे मन सांगायला आलें, तर तूं असं धुडकावून दिलंस मला ! रमा १: ठुमचं मन! सगळ्यांचीं मनं ! मला मात्र मन नाहीं! प्र हे पेसे, ( कनवटीचा रुपया काहून टाकते.) वेळप्रसंग पडला तर॒ अफू खायला पुरतील एवढेच पेसे शिछक आहेत माझ्याजवळ. ते घर अन्‌ काप तुझ्या घाकव्या दोन मुलींचा गळा. आज तीं माणसं तुला पैसे देऊन वुझ्या मुली करतील अन्‌ उद्यां चारचार पोरं गळ्यांत अडकावून त्यांना रस्त्यावर पाठवतील, तेव्हां मात्र येऊं नको माझ्याकडे सांगायला, अन्‌ माझ्या त्रहिणींना पण माझा लग्नाचा अहर म्हणून सांग कीं, पाळपाटलाटण्याची आतांपासून तयारी करून लग्न करा; कारण अडाणी मुलींना नवऱ्याचा आधार तुटला तर संक- टांत पोळपाटलाटण्याखेरीज दुसरा आधार नाहीं ! [ जाते. बरोबर तांदुळ निवडण्यासाठीं जमवलेलें सामानही घेऊन जाते. ] आईे : नको ब्राई रुपया. जा आपला घेऊन [रमा परत येत नाहीं. रमाबाईची आई रुपया उचलते व जाऊं लागते, ] आहे : ज्याच्या कळा त्याला माहीत. गरीब आईबापांचं म्हणज चारी बाजूंनीं मरण ! ( जाते.)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now