पंडित महाशय | Pandit Mahaashaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pandit Mahaashaya  by भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ पंडित महाशय धाकयऱ्या बहिणीच्या तिखट नजरेसमोर धनीपणा गाजवायची वडील भावाची लहर फिकी पडली. त्याच्या तोंडाबाहेर शब्द उमटला नाहीं. त्याच आवेशाने कुसुम म्हणाली, “ दादा, जातोयस कीं नाहीं? ” आतां तो कुंजनाथही नव्हता, तो चढा आवाजही नव्हता, तं अवसान केव्हांच संपलें होतें. चीं चीं करीत तो म्हणाला, “म्हणतोय ना, एवढा तंबास भरून दे म्हणज जातोंना १?” “ दे इकडे.” असें म्हणून कुसुमनें हात पुढें करून चिलीम घेतली आणि ती निघून गेली. एकदोन मिनिटांनीं ती परत आली आणि गुडगुडीवर चिलीम ठेबून म्हणाली, “ सोनाराच्या दुकानीं जातोयस ना?” (८ हो १9 कुंज म्हणाला. “ जा तर. ” कुसुम अगदीं सहजासहजीं म्हणाली, “ फार रात्र करू नकोस. आतांच होईल जेवण तयार. ” हातीं गडगुडी घेऊन कुंज हळुहळू घराबाहेर पडला. २ त्या दिवशीं व्ंदावनचा कौटुंबिक इतिहास बहिणीजवळ सांगतांना कुंजने य॒त्किचितही अतिश्योक्ति केली नव्हती. खरोखरच त्याच्या धरांत लक्ष्मी बागडत होती. असं असतांही कुणीही त्याबद्दल ठ्रथाभिमान किंवा ताठा बाळगीत नव्हतें. त्या गांवीं शाळा नव्हती. लहानपणी वृंदावन स्वतःच्या प्रयत्नानेंच बंगाली लिहायला वाचायला शिकला होता आणि तेव्हांपासूनच गांबांत एक शाळा उघडायचा त्यानें संकल्प केला होता. त्याचा बाप गौरदास पक्का माणूस होता. वृंदावन त्याचा एकुलता एक मुलगा, पण'त्याचा हा एवढा हट्टसुद्धां पुरवायला तो तयार झाला नाहीं. बापाच्या मृत्यूनंतर त्यानें आपल्या स्वत:च्याच ओसरीवर शाळा उघड- ण्याचा संकल्प करून तो अमलांत आणला. त्या द्याळेत कुणाला फी नव्हती. गांवांत एंक म्हातारा पेन्शनर मास्तर होता. त्याच्याजवळ त्यानें इग्रजी शिकायला सुरवात केली. रात्रीच्या वेळीं येऊन तो त्याला शिकवीत असे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now