तोंडमिळवणी | Tondamilavani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तोंडमिळवणी  - Tondamilavani

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ उ प्रस्ताव कानापर्यंत येऊन केव्हांच पोचत नसे म्हणूनच निर्वेधपणें लेखनकार्य करणें शारदाबाइईला शक्‍य झालें होतें. 8 शेवटीं एकदांचें शारदाबाईचें नष्टचर्य संपलें, एके दिवशीं अर्धांगवायूचा 'झटका येऊन गणपतरावांचें अवतारकृत्य आटोपले. खोटे दुःखाश्र गाळीत -बसण्याइतका दांभिकपणा शारदाबाईच्या अंगी नव्हता--तरीही चंपेला आलेल्या दुःखाच्या उमाळ्यानें तिच्याही डोळ्यांतून एकादे टिप गळल्यावांचून राहिलें . नाहीं. पत्नीला होणाऱ्या वास्तविक दुःखाची जागा चंपेच्या दुःखानें घेतली होती. गणपतरावाच्या पत्नीची जागा चालवीत होती ती तीच. शारदाबाईला गणपतरावाचा जो सहवास घडला होता तो तिच्या दृष्टीने तिला इतका पुरातन- 'काळीन वाटत होता---स्वम्नांतल्या आठवणींसारखा वाटत होता--कीं त्या सहवासाच्या संपर्कानें दुःखाची जाणीव होण्याइतकी ज्वाळा तिच्या हृदयांतून बाहेर निघणें अशक्य होतें. शारदाबाईनीं दुःखाचें कोणतेच प्रददीन केलें नाहीं याचें चपेला आश्चर्य वाटलें नाहीं. मृत्युपत्र करून ठेवण्याइतकें गणपतरावांचें वय झालें नव्हतें. त्यांनीं पैसा भरपूर मिळवला होता आणि यथास्थित उधळमाधळ करूनही भरपूर पैसा संग्रहीं ठेवला होता. त्या सर्व पेक्षाची शारदाबाई ही एकटीच मालकीण झाली होती. सासरच्या माणसांपकीं कुणीच शिछक राहिलें नसल्यामुळें हा सारा पैसा तिला मिळाला होता. 8 चंपेला आतां नवा संसार थाटतां आला असता असें शारदाबाईला वाटलें 'पण तसें कांहीं झालें नाहीं. तारिणीला--शारदाबाईच्या मुलीला--सोडून जाणें तिला अशक्य होतें, तारिणीचा हा लोभाचा दुवा मधे नसता तरीही जातीधर्मा- प्रमाणें ती दुसऱ्या संसारांत पडली नसती. तिच्या जातींतील ज्या कांहीं घरंदाज बायका होत्या त्यांच्या अनुकरणानें तीही शारदाबाईबरोबर राहून शारदाबाई- प्रमाणेंच कुंकु पुसून वेधव्याच्या दर्दोत आयुष्य घालवायला तयार झाली होती. दोघींचें आतां एकच ध्येय होतें---तारिणीला समर्थ करणें. त्या एकाच ध्येयावर लक्ष ठेवून नव्या ईर्षेने नव्या आयुष्याच्या नव्या पाउलवाटेवर आतां त्या दोघीही पुढें जाण्यासाठीं उभ्या राहिल्या होत्या. पूवीची परिस्थिती आतां उलटली होती. पूर्वी शारदा निराश्रित होती. 'आश्रिताची पदवी चंपेकडे होती--किंबद्ुना चंपेच्या क्पेमुळेंच शारदा अजूनपर्यंत घरच्याघरीं राहायला समर्थ झाली होती.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now