नाट्य कला - प्रवेश | Naataya Kalaa Pravesh

5/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नाट्य कला - प्रवेश  - Naataya Kalaa Pravesh

More Information About Author :

No Information available about अवधूत महादेव जोशी - Avadhoot Mahadev Joshi

Add Infomation AboutAvadhoot Mahadev Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) बहुतेक सर्व संकेतांस यथायोग्य लागू पडणार्री उदाहरणें त्यांतून सहज मिळण्यासारखीं होतीं. तेव्हां उदाहरणादाखल धथेतलेल्या नाटकांच्या संख्येस साहजिकच मर्यादा पडली. प्रस्तुत ग्रंथ प्रामुख्यानें होशी नटांसाठी लिहिला आहे. वास्तविक कलेच्या साधनेमध्यें होशी नट व धंदेवाईक नट असा मेद करतां येत नाहीं. नाटयवस्तूचा सूद्म अभ्यास करण्यापासून अभिनयकलेचे तांत्रिक संकेत पाळण्यापर्यंत सर्व प्रकार उभयतांना अमलांत आणावेच लागतात. फरक इतकाच कीं, धंदेवाईक नट आपलें सगळें जीवन आपल्या कलेला वाहून घेत असतो, तर होशी नट आपला नित्याचा व्यवसाय सांभाळून फावल्या वेळांत कलेची सेवा करीत असतो. परंठु हा फरक महत्त्वाचा आहे. स्टॅनिस्लाब्ह्स्कीप्रणीत “* मानस-तंत्रा 'प्रमाणे आपण करीत असलेल्या भूमिकेचें “जीवन जगत राहणें ? हॅ होशी नटांपेक्षा धंदेवाईक नटांस अधिक शक्‍य, धंदेवाईक नटास तांत्रिक युक्त्याप्रयुकत्यांकडे दुलेक्ष करून चालत नाहीं हें खरें; परंतु अनेक वर्षीच्या अभ्यासाने त्या त्यांच्या अंगवळणी पडलेल्या असतात. होशी नटांस मात्र त्यांचा नीट अभ्यास करणें अवश्य होऊन बसतें; इतकेंच नव्हे तर त्याचें बरेचसे यश त्यावरच अवलंबून असतें. यामुळें नाटयकलेकडे पाहण्याचा त्याचा दाषट्रकोन थोडाफार संकुचित असणें अपरिहार्य आहे. अशा नटांच्या मार्गदर्शनासाठी प्रस्ठुत- सारख्या ग्रंथाचा विशेष उपयोग होण्यासारखा आहे, ही जाणीवच या प्रयत्नाच्या मुळाशीं आहे. या विषयावर खरोखरी रा. चिंतामणराव कोल्हटकर, रा.केशवराव दाते, रा. के. नारायण काळे, रा. केशवराव भोळे यांच्यासारख्या एखाद्या अधिकारी पुरुषानें ग्रंथ लिहावयास पाहिजे. माझा हा प्रयत्न शानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे “पांखिफुट्या १? पांखरास[रखा आहे. त्यांत गरुडझेप साधण्याची अवास्तव महत्त्वाकांक्षा बाळगलेली नाहीं. प्रसिद्ध गायक मरहूम रहिमतखा यांजबद्द अशी आख्यायिका सांगतात कीं, ते कुणाच्या सांगण्यानें सहसा गावयास बसत नसत. त्यांना गावयास प्रवृत्त करावयाचें म्हणजे आधीं एखाद्या बेसुऱ्या गायकास त्यांजसमोर गावयास बसवावयार्चे; त्याचें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now