गुजगोष्टी | Gujgoshti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gujgoshti by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इतकेंच काय, ज्याच्या तारुण्याची सारी सौंदर्यसंपत्ति नाहींशी झाली आहे अशा म्हाताऱ्याच्या, किंवा ब्रह्मदेवाने ज्याच्या हातीं सौंदर्यसंपत्तीची एक पैही लागूं दिली नाहीं अशा एखाद्या कुरूप पुरुपाच्या तोंडावर चमकणारे हास्यही, तें अंतःकरणापासूनचे असेल तर, आनंददायक वाटल्यावाचून रहात नाहीं. कुरूप स्त्रीने किंवा पुरुषानं भूषणांचा किंवा वस्थालंकारांचा सोस केला कीं, तें दृहय रमणीय वाटण्याऐवजी उपहासास्पदच वाटतें. नकट्या नाकावरची मोरणी, हाडकुळ्या उंच मानेंतल्या पोतपेट्या, काटकुळ्या दंडावरच्या वांकी आणि काळ्या कभिन्न देहावरच कोईमतुरी गुलाबी पातळ, हीं सर्व आल्हादापेक्षां विनोदाचींच उत्पत्तिस्थानें ठरतील; आणि त्याचप्रमाणे कोळशाचा रंग आणि उंसाच्या चिपाडाचें सौष्ठव अगीं असणाऱ्या एखाद्या तिरळ्या माणसानें भिकबाळी-सलकड्यांचा थाट केला आणि रेशीमकांठी बोतर-उपरण्यांचे सोंगे सोडले तर त पाहून पाहणाऱ्या डोळ्यांना समाधान वाटण्याऐवजी वीटच येईल. परंतु सुहास्याची गोष्ट मात्र अशी नाहीं. हसणारी व्यक्ति कशीही असली तरी तिच सुहास्य पाहणाराच्या मनाला प्रेसन्न करील. शेवाळाच्या अलं कारानही कमळ सुंदरच दिसत, या कालिदासाच्या उक्तींत जरा पालट करून असे म्हणतां येईल, कीं सुहास्य हा अलंकार असा आहे कीं, तो कोणत्याही समुखकमलावर मनोहरच वाटतो. आणि याचं कारण हे कीं, हा अलंकार कृत्रिम नसून नेसर्गिक आहे. सुहास्य हें एका अंतःप्रवृत्तीचं चिन्ह आहे, व ती अंतः- रे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now