खाडिळकरांचा नाट्यकृती | Khaadilakaraanchyaa Naatayakriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Khaadilakaraanchyaa Naatayakriti by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० खाडिल करांच्या शीला सी चला र्ला लोह आपण तयार आहींत असं द्रौपदी सांगते, व द्यूत व्हावयाचं ठरतं. या ठिकाणीं दुसरा अंक संपतो. तिसऱ्या अंकांत दूत होतं, पांडव सर्वख गमावतात, दुःशासन राजसभेत द्रौपदी-वल्रहरण करतो, श्रीकृःग वस्रहरण होऊं देत नाहीं आणि अखेर पांडव वनवासाला निघतात. नाटकांतल्या प्रत्येक अंकाच्या दोवटीं उत्कंठा वाढवीत नेण्याचं कौशल्य या एकंदर मांडणींत कोटें तरी आहे कां तें पहा उलट पहिल्या अंकांतील द्रौपदी आणि दुसऱ्या अंकांतील द्रौपदी यांत इतकी विसंगति आहे कीं, त्या विसंगतीमुळें नाटकांत विलक्षण विस्कळित- पणा आलेला आहे. कृष्णाची अग्रपूजा सवानीं मान्य केलीच पाहिजे या हट्टासाठीं जी द्रौपदी खाडिलकरांच्या नाटकाच्या पहिल्या अंकांत युद्धाला तयार झाली ती एकदम दुसऱ्या अंकांत जुगाराला तयार होते हें मनाला कधीं पटण्यासारखं नाहीं. या कोलांटी उडीचं पुष्कळ समथन खाडिलकरांनीं तिच्या तोंडीं घातलं आहे. त्याचा सारांश एवढाच आहे कीं, “धश्रीकृष्गाच्या अहंकारामुळे संग्राम झाला असा दुलींकिक व्हावयाला नको... श्रीकृष्णाचा स्तुतिपाठ वैऱ्यांनाही आपण करा- वयाला लावला--वरपांगी कां असेना--तेवढा तरी करावयाला लावला तरी गुरु- दक्षिणा दिल्यासारखी नाहीं कां होणार १... श्रीकृष्णासारख्या गुरूच्या शिकवणुकीचा फेलाव करण्याचें आपलें काम सुलभ व्हावें म्हणून... .पांडवांनीं दारिद्याची दीक्षा घ्यावी, ” हें समर्थन कुणाच्या तकेबुद्धीला पटण्यासारखं आहे १ एक तर दूत खेळायला मिळत असेल तर्‌ श्रीकृष्णाची स्तुति करतों असं म्हणणाऱ्या दुर्योध- नाची कृष्णस्तुति द्रौपदीला पुरेशी वाटते, असं समजणं मूखेपणाचं आहे. शिवाय श्रीकृष्णाच्या अभिमानाखातर पांडवांनी युद्ध केलं तर लोक नांवं ठेवतील असं द्रौपदीला वाटलं असं समजणं दुप्पट मूखेपणाचं आहे. आणि पांडव वनवासांत गेले म्हणजे कृष्णचरित्राच्या शिकवणुकीचा त्यांना अधिक फैलाव करतां येइल असं द्रौपदीनं म्हणावं हा मूखपणाचा कळस आहे. पग खाडिलकरांना या आख्यानांत शब्तरपराडसुखतेचा आणि अहिंसेचा संदेश घालावयाचा होता. शिवाय “ कॅग्रेसनं वनवासांत जावं ' ही जी गांधींची घोषणा ' द्रौपदी ' नाटकाच्या जन्माच्या वेळीं हवेंत होती तिचाही त्यांना प्रचार करावयाचा होता. म्हणून युक्तायुक्ततेचा विचार पार झुगारून देऊन त्यांनीं ते दोन संदेश कोंबले आपल्या नाटकांत, आणि महाभारतांतल्या एका शोकपूर्णे पण रम्य प्रसंगाचा पुरता विचका त्यांनीं करुन टाकला !
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now