पेशवाईचें मन्वंतर | Peshaviche Manvantar

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
35 MB
                  Total Pages : 
308
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द् पेशवाईचें मन्वंतर
आवड आहे खरी; पण माझ्या जनानखान्याला पुरून उरण्याइतक्या सुंदर
व॑ तरुण मुली तुमच्या राज्यांत मला मिळण्याजोग्या असतांना मी तुमच्या
ठायींच कां म्हणून आसक्त राहूं ? रोज तीनत्रिकाळ ताज्या ताज्या सुवासिक
फुलांची पखरण पायांवर पडावी इतका मी थोर भाग्यवान् असतांना निर्माल्यां-
तील कोमेजलेल्या फुलावर मीं संतोष कां म्हणून मानावा ? *
त्याच्या त्या परमावधीच्या निष्ठुर बोलांनीं बिचाऱ्या राणीच्या हृदयाचे
दातशः तुकडे तुकडे केले. आपण फसलो, ह्या विदवासघातकी चांडाळानें
आपला कॅसानें गळा कापला, हें ती पक्के ओळखून चुकली. तिनें त्याला
काकुळतीला येऊन विचारलें, “ विश्वासघातक्या, तूं माझ्याशीं बेइमान
झालास तो झालास; पण आपल्या धर्माशींदेखील बेइमानी करतोस ! तूं
अस्सल मुसलमान नाहींस. *
“ मी अस्सल मुसलमान आहें. मीं माझ्या धर्माशी बेइमानी केलीह्ी
नाहीं व मरेतों करणारही नाहीं. *
“तर मग तूं सकाळींच माझ्यापाशीं कुराण हातीं घेऊन शपथ घेतलीस
त्याचा अर्थ काय १ “” ज्या महालांत त्या दोघांची सकाळीं भेट होऊन शपथेचा
खेळखंडोबा झाला होता, त्याच महालांत त्या दोघांचें आतांचें संभाषण
चाललें होतें. सकाळचें तें भरजरी बासनांतलें कूराण अजून तिथेंच पडलें
होतें. तें हातीं घेऊन राणीनें चंदासाहेबापुरढें करून विचारलें, “ हया तुझ्या
पवित्र धर्मग्रंथाची तरी कांहीं लाज राख ! *
चंदासाहेबानें दिक्ट हास्य करीत राणीच्या हातांतून तें बासन हिसकावून
घेतलें व तें उलगडून तिच्यापुढें फेकीत म्हटलें, “ज्या कुराणाची शपथ मीं
सकाळीं घेतली तें हें कुराण पहा ! ”
तें कुराण नव्हतें; ती जरीच्या वासनांत गुंडाळलेली मातीची वीट होती !
राणी तो प्रकार पाहुन जास्तच खवळली व चंदासाहेबाला अगणित ब्िव्या-
शाप देऊं लागली. पण त्याचा परिणाम काय झाला? त्याच क्षणीं त्या
विश्वासघातक्याच्या मुखांतून निघालेल्या हुकुमासरसा बिचारीच्या कपाळीं
जन्माचा बंदिवास आला. शिपायी तिला धरून कँदखान्याकडे नेऊं लागले
तेव्हां जखमेवर मिठाचें पाणी शिपडावें त्याप्रमाणें त्या मदोन्मत्तानें आणखी
उ गार काढले, “ मूर्ख स्त्रिये, मला विरोध करणाऱ्या सर्व मर्कटांचा जसा
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...