महापूर | Mahaapoor

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महापूर  - Mahaapoor

More Information About Author :

No Information available about दत्तात्रेय चिंदरकर - Dattatreya Chindarakar

Add Infomation AboutDattatreya Chindarakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाराचा पोर “ मोठा धमराजाच लागून गेलास कीं नाहीं १ तूंच माझा मासा चोरलास, मुकाट्यानं कबूल कर; नाही तर माझ्याशीं गांठ आहे. फोट्ूून काढीन या 'गरीच्या काठीने !” “ नाहीं चाकरमानी. तुमचा मासा मीं चोरला नाहीं. कां उगाच माझ्या नांवावर घालतां १” ““ तर तर, मोठा सावच कीं नाहीं तूं १ तुझ्या नांवावर घालतो !” त्याला वेडावित ते म्हणाले, “ खरंच मीं नाहीं चोरला, देवा शपथ नाहीं. रामेश्वराची शपथ---?” अगदीं गयावया करीत काळ्या बोलला. “ असं म्हणतोस १ बरं ! मग तुझी ती टोपली पाहूं देरे ! कर बाजुला फडका !”* काळ्यानें अगदीं स्वाभाविकपणे फडका बाजूला केला. चाकरमान्यांनीं पाहिलें-एक मोठा सुळा त्याच्या टोपलीत आहे. त्याचें पिवळसर अंग उन्हांत कसें चमकत होतें. बंदुकीच्या छऱ्याच्या खुणाही त्याच्या अंगावर दिसत होत्या. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. “ काळ्या, किती खोटं बोलतोस १” ते गजेना करून म्हणाले. चाकरमानी आतां राग्क्ने थरथर कांपत होते. काळ्याला खाऊं कीं गिळूं असें त्यांना होऊन गेलें, मात्र काळ्या अत्यंत शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसल्याही शरमेचें चिन्ह दिसत नव्हतें, उलट त्याचा चेहरा सांगत होता, कीं काळ्या अत्यंत निर्दोषी आहे. “ काळ्या, बोल ! कुणाचा हा मासा १ कुटं तुला मिळाला १ माझाच चोरलास कीं नाहीं १” “ नाही चाकरमानी, मासा माझा आहे. माझ्या गरीला लागला, तुमचा मी कां चोरीन १” टि“




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now