धुकें आणि दहिंवर | Dhuken Aani Dahinvar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
153
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१२ घुकें आणि दहिंवर
मनाची अनुदारता, जुलमाला वाकणारीं त्याचीं मने ,--ह्या सर्वच
गोष्टींमुळे मला वाटे; हीं आपल्यासारखीं माणस नव्हत.
वानरापासून आजचा मनुष्य उत्क्रात झाला म्हणतात. त्या
उत्क्रातीच्या पायऱ्यापैकीं ही एकादी असावी, असेंच मला
कितीकदा वाटे. मला त्याची कींव येई. कित्येकदा चीडही. मी
त्याच्या जगात नेहमीं फिरत आलों आहे. त्याना द्यक््य तितकी
मदत केली आहे. परंतु त्याच्याशीं मी समरस कधीं झालों नाहीं.
पाण्याच्या भाड्यात टाकलेल्या तैलबिदूप्रमाणें मी पाण्यात राहूनही
पाण्याबाहेर राहिलों.
महात्माजींच्या उपवासाने माझे डोळे उघडले. ह्या माणसाचीं
जनावरे बनविण्याचे अमानुष काम कोणी केलें १ ही माणसा-
सारखीं माणसे मातीला कशींमिळालळी १ त्याच्यात व आपल्यात ह्या
भिती कुणी उभारल्या. उउ्ज्वल, हैं राक्षसी कार्य आपण, स्पृश्य
हिदू समाजानें केलें.
ह्या पापाचे धनी आपणच आहोंत. पिढ्यान् पिढया त्यानी
आपल्या समाजाच्या सुधारणेला मदत केली आहे. शतकानुशतके
आपलो पवित्रता त्यानीं रक्षण केली आहे. आपल्या पाविन्याचे
रक्षण करण्यासाठीं त्याना अमंगळ अपवित्र कामें करावीं लागलीं.
त्याची त्यानीं क्षिती बाळगली नाहीं,
ह्या त्याच्या कामगिरीचे समाजाने काय मोल केलें ? त्याना
आम्हीं वाळींत टाकले, त्याची वसति गावापासून दूर वसवली.
त्यानीं अमंगळ कामें उचललीं; म्हणून त्याचे सारे जीवन अम-
गळ गलिच्छ केलें. त्याच्या वस्तीला विहिरी लागत नाहींत, रस्ते
बाधले जात नाहींत; तर नाल्या कुठल्या १ दिवे-ताराचा प्रकाय
त्याना पुरतो असे आमचे मत.
आणि ह्या अमंगळ जीवनातून निमाण झालेलीं अमंगळ
माणसं पाहिलीं म्हणजे आम्हीं त्याचा तिरस्कार करतों. त्याच्या
स्पशानें आम्हाला विटाळ होऊं लागतो. जगाला पावन करणारा
पावन आणि पाणी त्याच्या स्पर्शाने स्वतः अपवित्र होतात.
User Reviews
No Reviews | Add Yours...