शीळ | Shil

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shil by ना. घ. देशपांडे - Na. Gh. Deshpandeमंगेश विठ्ठल - Mangesh Viththal

More Information About Authors :

ना. घ. देशपांडे - Na. Gh. Deshpande

No Information available about ना. घ. देशपांडे - Na. Gh. Deshpande

Add Infomation AboutNa. Gh. Deshpande

मंगेश विठ्ठल - Mangesh Viththal

No Information available about मंगेश विठ्ठल - Mangesh Viththal

Add Infomation AboutMangesh Viththal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नसते. म्हणून काव्य संगीताचें थोर वरदान असणारा हा कवि काव्य-गायनाच्या काळांतहि अनोळखीच राहिला. तोहि केवळ सामान्य वाचकाच्या हिशेबी नव्हे. त्याला ज्यांनीं दिशा दाखवायची त्या टीकाकारांनाहि त्याची पुरी दखळ नव्हती. प्राध्यापक रा. श्री. जोगांसारख्या व्यासंगी आणि ममेश टीकाकारानेहि १९४६ सालच्या “अर्वाचीन मराठी काव्य? या ग्रंथांत ना. घ. देशपांडे यांना “नवोदित? कवींच्या रांगेत उभ करून “(त्यांच्या) जानपद वातावरणाच्या आणि प्रेमाच्या कविता अनेकांच्या मुखांत आज असलेल्या दिसतील” या पाट- थोपटणीवर त्यांची बोळवण केली आहे. “एकत्रित काव्यसंग्रहाच्या अभावीं त्यांच्या काव्याचा योग्य तो परामश घेणें अशक्य झालें आहे?” या त्यापुढील कबुलींत थोडीशी सबब आहे, पण ती अपुरी वाटते. कांहीं वऱ्हाडी साहित्यि- कांना या उपेक्षेत सूक्ष्म अढी भासठी. पण आतां प्रा. भवानीशंकर श्री. पंडित या तत्प़्रांतीयाच्या “आधुनिक मराठी कविता? या ताज्या (१९५३) इतिहासांत ना. घ. देशपांड्यांच्या खातीं चार ओळी अधिक खर्ची घातल्या असल्या तरी त्यांत *पद्याचें प्रसाधन आणि नादमाधुरी ? यापुरतेंच जुजबी रसग्रहण आहे. आणि “(व्यांच्या) प्रेमगीतांत भावनेच्या आविष्कृतीपेक्षां पद्याच्या प्रसाधनाला अधिक महत्त्व दिलेलें असतें, ?” असा वर शेरा आहे. आधुनिक साहित्याचा आणखी एक ताजा इतिहास म्हणजे डॉ. वि. पां. दांडेकरांचा. त्यांत देश- पांड्यांचा केवळ नामोल्लेख आहे. दहा-पंधरा कवींबरोबर त्यांचें नांव एका वाक्यांत कोंबलेलें आहे. अशी त्यांची टीकाकारांकडून संभावना झाली आहे. “भावगीत? हॅ, इतर अनेक साहित्य-प्रकारांप्रमाणें, आपण इंग्रजींतून उचलले. *“लिरिक'? या इंग्रजी नांवाचें ग्रीक मूळ शोधून त्यांतील संगीत-छटा आणण्याची भाषांतरी खटपट “वेणिक? या शब्दाने केली. पण खुद्द इंग्रजीतच ती छटा केव्हांच हरवून त्या जागीं भावपरतेनचें लक्षण स्थिर झाल्याचें ध्यानांत येतांच “भावगीत? हें नांव अधिक योग्य वाटून प्रचारांत आलें. पण नांवनिशी- बाबत व्युत्पत्तीचा पंडिती पुळका आपल्याला नेहमींच फार; तेव्हां त्याच्याशीं तडजोड म्हणून “गीत 'पद राहिलेंच ! वस्तुतः इंग्रजी साहित्य विचारांतहि या काव्यप्रकाराची निश्चित सरणी नाहीं, नव्हती, काळाप्रमाणें तिचे रंग बदलत गेले. मराठी भावगीतकारांच्या पहिल्या पिढीला स्फूर्ति मिळाली ती एकोणि- साव्या शतकाच्या पूर्वांथीतील “रोमॅंटिक? इंग्रजी कवींकटून. त्या कवींची द
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now