स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ ४ | Swaamii Vivekaananda Samagra Granth 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ ४  - Swaamii Vivekaananda Samagra Granth 4

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खंढ ] वकोलंबो-आल्मोरा व्याख्यानमाला. ण हास चाळून पाहिला तर सर्वत्र हाच प्रकार आपणांस आढळून येईल. सर्वत्र अशी स्थिति असतांही आर्यभूमि मात्र शांततेने नांदत आहे ! ग्रीस राष्ट्रला अस्तित्वही नव्हतें, अशा वेळीं आर्यभूमि कार्यरत होती. ज्यावेळीं रोमन राष्ट्र कल्पनेच्याही हद्दीत आलें नव्हतें, त्यावेळीं आर्यभूमि आपलें कार्य कर्रात होती! ज्यावेळीं सांप्रतच्या युरोपियांचे बापदादे अंगाला रंग लावून राना- वनांत भटकत होते, त्यावेळीं आर्यभूमि सत्य प्रमेयांच्या उद्घाटनांत गहून गेली होती ! इतिहास कशाशीं खातात याची कल्पनाही कोणाला नव्हती अशा वेळीं, आणि ज्या जुन्या काळाच्या अंधाऱ्या गुहेत इतिहास डोकावूनही पाहू शकत नाहीं, त्यावेळींही आर्यभूमीचें मानवसंस्कृतीचें कार्य चालूच होतें. त्या कालापासून तो तहत चाळू क्षणापर्यंत तिचें हें कार्य अव्याहत चालू आहे. त्या कालापासून चाळू क्षणापर्यंत अनेक विशाल प्रमेयें तिच्यांतून बाहेर पटून जगभर पसरत आहेत, आणि प्रत्येक प्रमेयाबरोबर आशीर्वाद आणि शांतता ह्दीही जात आहेत. आमच्या राष्ट्राने जगद्विजयाचें कार्य केलें नाहीं किंवा तरवारीच्या धारेनें दुसऱ्या एखाद्याही राष्ट्रस त्यानें जिंकळें नाहीं. आमच्या राष्य्नें सवांना * चिर जीव १ असा आशीर्वाद मात्र दिला आहे. आह्मी आजपर्यंत जीव धरून आहों याचें कारण हेंच. ग्रीक लोकांच्या चतुरंग सैन्याची चाहूल लागतांच सर्व जग थरा[रूं लागे असाही एक काळ येऊन गेला; पण त्याव ग्रीक लोकांचे काय झालें, याची वातीही सांगण्याला आज कोणी उरला नाहीं! या जगांत ताबा मिळविण्यासारखी जी जी वस्तु होती, ती प्रत्येक वस्ठु रोमन राष्ट्राच्या गरुड चिन्हांकित निशाणाखालीं गेली होती; या जगांतील अखिल मानवजातीच्या मानेवर रोमन लोकांचे जूं एके काळीं बसले होतें आणि 'रोम” या अक्षरांच्या उच्चारानेंच सर्व जग कांपत होतें. ज्या क्यापिटोल नांवाच्या टॅकडीवर शेकडो रोमन वीरांचे पुतळे त्यांच्या अतुल शौर्याची आणि जगळ्ेतृत्वाची साक्ष पटवीत होते, ज्या टेकडीवर शकडो देवमंदिरे होतीं आणि ज्या ठिकाणचे वैभव रोमन राष्ट्राच्या महत्त्वाची साक्ष पटवीत होतें, तेंच ठिकाण कालवशात्‌ आज नुसत्या दगडमातीचें निवासस्थान होऊन राहिलें आहे. ज्या ठिकाणीं सौझरांचा राजदंड एके काळीं होता, त्याच ठिकाणीं कोळी आपलीं राज्यें आज बिनघोकपणें स्थापित आहेत! रोम आणि ग्रीस यांच्याप्रमाणेच आणखीही कित्येक राष्ट्र उदयास येऊन अस्तंगत झालीं. पाण्यावरील लाटा नाहींशा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now