अंकुर | Ankur

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अंकुर  - Ankur

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अभिनंदनीय विवाह 3 कशाला ! तो गरीब असला तर आपल्या कर्तबगारीबर श्रीमंत होईल, आणि जरी तो श्रीमंत झाला नाहीं तरी मी श्रीमंत आहें ना. नुसत्या पैशावरच कां सौख्य अवलंबून आहे १ तो माझ्यापेक्षां ४५ वर्षांनी लहान आहे त्याचा एवढा ऊहापोह कशाला! चांगल्या घरंदाज कुळांतील तरुणानं वेश्येच्या मुलींशी टय़ करून पतितोद्धाराचा टेंभा मिरवाबा आणि मीं ज्याचे आईबाप माहीत नाहींत, परंतु जन्मापासन जो उच्च बातावरणांत वाढला आहे अशाशीं लग्न केले तर लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबाब्यात काय १?” कमल त्वेषानं व चिडून म्हणाली. ह सर्व ऐकून मला तर आश्चर्य वाटलंच पण कमलकान्त व बाबासाहेब यांचेहि चेहरे गंभीर झाले, त्या खोलींत त्या वेळीं फारच गंभीर वातावरण पसरलं होतं, कमलनं केलेल्या भाषणाचा परिणाम प्रत्येकाच्या मुखचर्येवर प्रतीत झाला होता, इतका वेळ बाबासाहब स्तब्धच होते, परंतु आतां त्यांच्याच्यानं राहवेना. ते क्षीण परंतु स्पष्ट आबाजांत म्हणाल, '* विमलाताई, कमळ, कमलाकान्त, तुम्ही तिघेहि सुशिक्षेत नि सुज्ञ आहांत, कालच्या सायं- काळच्या प्रसंगाने माझ्याहि मनावर विलक्षणच परिणाम झाला, ” “* होय बाबा, काळ रात्री तुम्ही टाकलेला मुलगा, भागिरथी, मीच पापी, असं कांहींतरी बडबडत होतां, ?? कमल शांतपर्ण म्हणाली, ** होय बाळ, तेच मी आतां सांगणार आहें. तुमच्या लग़ाला मींच संमति दिली व त्यामुळ तरी कमलाकान्ताला त्याच्या कुळासंबंधीं न्यूनगंडाची लागलेली बोचणी संपेल असंच मला वाटलं, आतां विषय निघालाच आहे. केव्हां तरी मला ते तुम्हां दोघांना सांगायऱंच होतं. विमलाताईहि आहे, ठीकच झाले. कमलाकान्ताचं जन्मरहस्य सगळ्यांना ठाऊक आहेच. काल संध्याकाळीं जसा एक टाकलेला मुलगा मीं पाहिला, तसाच प्रकार २२ वर्षांच्या मागं एकदां घडला, त्या वेळींदहि पोलीस पंचनामा करीत होते. मुलगा मात्र जिवंत होता. मुलासंबंधीं कुणीच कांह्दी बोलेना, शेवटीं त्या मुलाचं पालनपोषण मी करीन असं सांगून मीं तो घरी आणला. त्याच्या कपड्यांत गोखले एवढींच अक्षर लिहिलेली चिट्टी मला सांपडली, तोच हा आमचा कमलाकान्त गोखले. जग ह नुसतं तमाशा पाहणारं आहे, कमल, तूं जरी टाकलेली मुलगी नसलीस तरी तुझ्या जन्मरहस्याच्या बाबतींतहि थोडासा तसाच प्रकार आहे, ??




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now