झेंडूचीं फूलें | Jhenduuchiin Phulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jhenduuchiin Phulen by केशव कुमार - Keshav Kumar

More Information About Author :

No Information available about केशव कुमार - Keshav Kumar

Add Infomation AboutKeshav Kumar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्या मंडळानें अक्षरशः भडाभडा ओतली. त्याचा परिणाम दुसऱ्या कोणावर काय झाला मी कांहीं सांगूं दकत नाहीं. पण माझ्या स्वतःवर तरी असा झाला कीं भावकाव्याचें गंभीर अवगशुंठन झुगारून देऊन माझ्यामधला ब्रात्य विडंबनकार डुरकाळी फोडून एकदम बाहेर पडला. माणखावर आकस्मिक आपत्ति आली म्हणजे एका रात्रीत त्याच काळे केस जसे पांढरे होतात तम माझे झालं. माझ्या प्रतिभेला आलेलीं * दुपारीचीं फुलें ' एकदम गळून पडलीं. आणि तिच्यावर सरासरा * झैड्टचीं फुले ? फुळून आलीं. * रविकिरण मंडळ ' जर प्रकट झालें नसते तर माझ्या बुद्धीच्या खोल कपारीआडून विनोदाचा चांगला मनगटाणएवढा झरा वाहतो आहे याचा मला मुळींच सुगावा लागला नसता हें अगदीं खरें आहे ! “रविकिरण मंडळा 'नें इतर पुष्कळ कामगिरी कलेली असेल ! त्याच्याशीं मला या ठिकाणीं कर्तव्य नाहीं. पणे महा त्यानें विडंबनकार बनविले ही माझ्या दृष्टीने विदोष महत्त्वाची गोष्ट आहे. अठरा एकोणीस सालीं बालकवि आणि गडकरी वारले. त्यामुळे मराठी कविता एकदम मंदावल्यासारखी झाली. म्हणज जवळ जवळ तिची व्योत अगदीं माल्वण्याच्या बेतांत आली. शारदेच्या अंगणांत काळोख पसरला. बारीक सारीक कवि आपापल्या घराची दारे बंद करून आणि डोक्यावर दुल्या ओढून गप्प बसले. बाहेरच्या काळोखांत एकव्यादुकट्या कवीला फिरण्याची जणु कांहीं प्राश्ञाच नव्हती. अशा वेळीं पुण्यांतले सात आठ कवि एकमेकांचा हात धरून भीत भीत एका ठिकाणीं जमले आणि त्यांनीं एका कोपऱ्यांत एक लहानशी दोकोटी पेटविली. तिचं नांव * रविकिरण मंडळ.' ही मंडळी दर रविवारी एकत्रे जमत. आणि लिहिलेल्या कविता चहा पितां पितां तं एकमेकांना वाचून दाखवत आणि त्यावर चर्चा करीत. कबींचीं मंडळे त्या पूवी महाराष्ट्रांत तथापन झालीं नव्हतीं असें नव्हे. पणे * रविकिरण मंडळा 'चे स्वरूप अभिनव होतें. काव्यनिमितीसाठीं स्थापन झालेली ती एक प्रकारची सहकारी पेढीच होती म्हणानात. या मंडळींतले कांहीं कवि व्यक्तिशः त्या वेळीं महाराष्ट्रांत थोड्या फार प्रमाणाने माहीत होते. नाहीं असें नाहीं. पण त्यांना विद्ोष प्रसिद्धी अशी मिळाली नव्हती. त्यांच्या काव्यांत तोंपर्यंत तसें कांहीं बैशिष्टय प्रकट झालें नव्हते. पण * रविकिरण मंडळां ?त ही मंडळी सामील झाल्यापासून त्याच्या पूर्वीच्या स्वरूपांत एकदम फरक पडला. आणि त्यांपैकीं कांहींची चेहेरेपट्टी तर अजिबात बदळून गेली. ही किमया त्यामधल्या केवळ एकाच माणसाने केली त्याचें नांव प्रा. माधवराव पटवर्धन किंवा माधव जूलिअन . हेच * रविकिरण बे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now