कालिदासाची सृष्टी | Kaalidaasaachii Srishti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कालिदासाची सृष्टी  - Kaalidaasaachii Srishti

More Information About Author :

No Information available about मा. दा. आळतेकर - Ma. Da. Aaltekar

Add Infomation AboutMa. Da. Aaltekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कालिदासाची सा 'भाग पहिला विषयप्रवेश पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्टिकाधिष्टितकालिदासा । अद्यापि तत्तल्यकवेरभावा- दनामिका सार्थवती बभूव ॥ १, कालिदासाच्या कविकुलगुरुत्वाबद्दल कोटेंही दोन मतें नाहींत. प्राचीन पंडित आणि अर्वाचीन टीकाकार, या दोघांनाही जगाच्या महाकविमंडळांत कालि- दासाचें स्थान फार उच्च आहे हं मान्य आहे. संस्कृत काव्यमर्मज्ञ आणि युरो- पीय वाइ्ययप्रवीण या दोघांनीही कालिदासाची मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे. वरील सुभाषितांत वर्णन केल्याप्रमाणे, कोणी एक रसिक मनुष्य उत्कृष्ट कवींची गणना करूं लागला, तेव्हां कालिदासाचें नांव घेऊन त्यानें पहिलें बोट ( करांगुलि ) मोजलं आणि दुसरें बोट मोजण्यासाठीं जेव्हां कालिदासाच्या तोलाचें दुसरें नांव तो शोधूं लागला तेव्हां तें त्याला मिळेना; म्हणून करांगुली- जवळच्या बोटाला अनामिका हें यथार्थ नांव मिळालें; अशी कवीनें या सुभा- षितांत “अनामिका” या नांवावर कोटी केलेली आहे. तिजवरून संस्कृत वाढ्ययांत कालिदासाची मान्यता केवढी मोठी आहे हं सहज लक्षांत येतें. दुसऱ्या एका कवीनें कालिदासाला “कविकुलगुरु” ही पदवी बहाल करून त्याला कविताकासिनीचा विलास असें म्हटलें आहे. कालिदासाच्या भहाणपणाच्या होंकहों आख्यायिका प्रसिद्ध आहेत; आणि त्यांवरून त्याच्या भाषाप्रभुत्वाबद्दल व साहित्यनैपुण्याबद्दल लोकांत किती कौतुक होतें हें स्पष्ट दिसतें. त्याच्या घरच्या दासीसुद्धा मोठमोठ्या पंडितांना वादांत हरवीत आणि विद्येत लाजवीत असें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now