अराज्यवाद | Araajyavaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Araajyavaad by पां. वा. गाडगीळ - Pan. Va. Gadgil

More Information About Author :

No Information available about पां. वा. गाडगीळ - Pan. Va. Gadgil

Add Infomation About. . Pan. Va. Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राज्यसंस्था हीच अनर्थाचे मूळ ७ “कलह आणि युद्धे, दुःख, अन्याय आणि गुन्हे, दाश्यि आणि जुलूम? यांचा जिकडे तिकडे प्रत्यय येत आहे. असें कां? याचें कारण प्रत्येकाचे वैयक्तिक 'स्वार्थ' भिन्नभिन्न व परस्परविरोधी आहेत असें सांगण्यांत येतें. कसें तें पहा. मला एखादी टोपी किंवा जोंडा ध्यायचा आहे. मी दुकानांत जातें आणि मला हव्या असणाऱ्या मालाची किंमत विचारतो. दुकानदाराची इच्छा तो माल जास्तींत जास्त किंमतीस विकून जास्तीत जास्त नफा मिळवावा अशी असते आणि मला तो माल कमींत कमी किंमतीस मिळावा अशी मला इच्छा असते. एकाला अँ नुकसानीचे वाटतें तें दुसऱ्याला फायद्याचं वाटतें. आणि प्रत्येकजण दुसऱ्याचें नुकसान झाले तरी आपणास फायदा मिळावा अशी इच्छा करीत असल्यामुळें मी ० दुकानदार यांमध्ये चुरस अथवा विरोधीभाव उत्पन्न होत असतो. मी व दुकानदार या दोन व्यक्तींत जो हा हितविरोध दिसुन येत आहे तें सवच समाजाचें आजचें स्वरूप आहे. भांडवलदार हे नफा मिळविण्यासाठी आपसांत चढाओढ करतात. मजूर मजुरी मिळविण्यासाठीं आपसांत चढाओढ करतात. मजुरांची पिळणूक भरपूर करून भांडवळावर नफा खूप उरावा म्हणून भांडवलदार आपसांत षकजूट करून मजुरांना अडवितात. उलट मजूरही आपसांत संघटना करून भांडवलदारांना अडबितात. शेतकरी व जमीन-मालक यामध्येही असाच अडवाअडवीचा लढा चाललेला असतो. हा लढा चालतो त्यांत पक पक्ष बली व दुसरा दुबळ असतो आणि यामुळें पक पक्ष जास्तीत जास्त नफा मिळवून गबर झालेला आढळतो : तर दुसरा दारिद्याच्या चिखलांत रुतळेला असतो. जगाकडे नजर टाकली तर सर्वत्र असें दिसून येईल कीं गरीबांची संख्या अगदीं अफाट असून अगदीं अन्नान्नदशया होऊन किड्यामुंग्यांप्रमाणें मरणारे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now