समरांगण | Samaraangan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समरांगण  - Samaraangan

More Information About Author :

No Information available about म. भा. भोसळे - M. Bha. Bhosale

Add Infomation AboutM. Bha. Bhosale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र पण माझा भगवान ! अजून पंचविशीसुद्धां ओलांडली नाहीं त्याने; अन्‌ एवढ्या अल्पवयांतच त्याचे फोटो येऊं लागले. त्याला डोक्यावर घेऊन नाचावंसं वाटले मला. मी घांवतच ते वर्तमानपत्र घेऊन आंत गेलों, त्याच्या आईला दाखवायला! त्यांनाही केवढं समाधान वाटले! भगवानचा हंसरा फोटो जणूं त्यांना विचारीत होता, तुम्ही मला लहानाचा मोठा केला, माक्े नाहीं ते लाड केले, मला शिक्षण दिलें. मी ठुमच्या श्रमाचं चीज केले कीं नाहीं ! “ केलं, केलं ! ? असंच त्यांनीं अन्‌ मीही उत्तर दिलं असतं, पण त्यांनीं विचारलं, * कशाबद्दल आलाय्‌ फोटो १” मी तरी कुठं पाहिलं होतं. म्हणून मी वाचूं लागलों, तों आंगा- वर बोंबगोळ्याचा वर्षांव व्हावा तसं झालं मला ! मुंबईला गिरणी कामगारांचा संप चालला होता. अन्‌ तो लट- वायला गेली होती ही स्वारी. तिथं हजारों कामगारांपुढं भाषण करून त्यांत त्याने सांगितले काय, तर म्हणे, *सगळ्या जगांतली भांडवल- शाही समाजरचना बदलल्याशिवाय जग सुखी व्हायचं नाहीं. एका वर्गांनें रक्‍ताचं पाणी करून रात्रायचं अन्‌ दुसऱ्यानं त्याच्या जिवावर ऐषआराम भोगायचा हेच मुळीं चुकीचे आहे. आपल्या अज्ञाना- मुळें आजपर्यंत राबणारा वर्ग डोळे झाकून राबत आला. आपल्या श्रमाचा मोबदला--निदान आपल्या पोटाला तरी भरपूर मिळतंय कीं नाहीं, याची सुद्धां त्यांन चौकशी केली नाहीं. पण यापुढे त्याच्या श्रमाचा मोबदला त्याला मिळायलाच पाहिजे ! अन्‌ तसा मिळत नसेल तर तो आपल्या मनगटाच्या जोरावर मिळवील ! बोला, भांड- वलशाही नष्ट होवो, समतेचा विजय असो ! * मी स्वम्नांतच वाचतों कीं काय म्हणून पायाला चिमटा घेऊनखुद्धां -0११---




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now