कल्पवृक्षांच्या छायेंत | Kalpavriqsaanchyaa Chhaayent

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कल्पवृक्षांच्या छायेंत  - Kalpavriqsaanchyaa Chhaayent

More Information About Author :

No Information available about लक्ष्मणराव सरदेसाई - Lakshmanrav Sardesaai

Add Infomation AboutLakshmanrav Sardesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
--मी बाव्ह्ल, मी तुटलेली तार... --वसंघरा सकंप आवाजांत बोलत होती. --कवसू, ठुझं व्यक्तित्व मरत चाललं आहे. प्रत्येकाला व्यक्तिवैविष्टय हव. स्वतःच्या आवडीनावडी हव्यात. आपल्या हिताचा ध्यास हवा. नवरा व बायको. यांच्यांत विरोध नसला तरी वेगळेपणा, भिन्नत्व हवं. या भिन्नत्वासुळंच आयुष्याला जीवंतपणा येत असतो, संसारांत खळबळ 'चालू असते. नदीच्या पाण्यांत प्रवाह असतात. म्हणून तिचं पाणी चांगलं राहतं. पाण्याला गती नसली म्हणजे डबकं सांचतं. तसं आपलं आयुष्य... मी बोलत होतों. प्रेमळपणानें, सावकाश बोलत होतों...आणि ती माझें व्याख्यान ऐकत होती. आज मी थोडें उघड बोललों इतकेंच. बाकी निरनिराळ्या सौम्य प्रकारांनीं मी तिला माझ्या आवडीनावडी नेहमीं सांगत होतों. पण ती आपल्या संसारांत गुरफटलेली. माझें मन तळमळत होतें. अपेक्षित सुखासाठी धडपडत होतें. मी वेडा होतों अन्‌ ती फार शहाणी, फार व्यवहारी होती असें हवें तर म्हणा. पण माझी मनोरचना सुळापासून ही अशी होती. वसुंधरा ज्याला “संसार १ * संसार म्हणत होती, त्या संसाराला माझ्या आयुष्यांत गौण स्थान होतें. मुख्य म्हणजे ख्लीसुख. खाणें जेवणें म्हणजे कांहीं संसार नव्हे. संदर स्त्रीच्या ललितरम्य सहवासांत आयुष्यांतील दिवस घालवावे हीच माझी इच्छा. मुलांबद्दल उत्कट ओढ माझ्या मनांत केव्हांच उत्पन्न झाली नाहीं. त्यांच्या सह- वासाकरतां मन तळमळलें नाहीं. उलट प्रत्येक मूल आमच्या सहवासांत वेगळेपणा उत्पन्न करीत होतेंसें मला वाटे. वसुंधरा थोडावेळ राहून आंत निघून गेली. मी खुर्चीवर बसून विचार करूं लागलों. कोणत्या आशा बाळगून मी लग्न केलें अन्‌ शेवटीं काय झाले १ लग्मापूर्वीची वसुंधरा किती वेगळी होती ! जशी सुंदर॑ तशीच आनंदी, हुशार, वादपट्, बुद्धिमान. माझ्या एका नाते- बाईकाची ती मुलगी होती. माझें त्यांच्याकडे जाणें येणें होतें. मला जांवई करावा असें जेव्हां त्यांच्या मनांत आलें तेव्हांपासून वसंधरेची €




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now