हिमाळयाच्या कुशींत | Himaalayaachyaa Kushiint

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिमाळयाच्या कुशींत - Himaalayaachyaa Kushiint

More Information About Author :

No Information available about स्वामी अखंडानंद - Swami Akhandanand

Add Infomation AboutSwami Akhandanand

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द्िजालयाच्या कुशीत ११ सत्काराची तत्परता पाहून मी चकित झालों. मनांत आलें, जंगम साधु म्हणत होता की या मार्गातील प्रवासांत कोणी कुणाचा आदरसत्कार करीत नाही. मग हें काय ? मी भाकरी खायला बसलों आणि ती बाई एकीकडे मला आईवडील आहेत की नाही, मीं इतक्या लहान वयांत संन्यास कां घेतला इत्यादि प्रश्‍न विचारत होती. मीहि तिच्या प्रनांचीं तिच्या मनासारखीं उत्तरें देत होतों. इतक्यांत तिने डोक्यावर मोळी घेऊन येत असलेल्या आपल्या नवर्‍याला दुरून पाहिलें. त्याला पाहतांच ती अतिदाय गांगरली आणि मला म्हणूं लागली, “ हें पाहा, माझा नवरा खूप निदंय आणि कमालीचा चिक्कू आहे. कोण्या साधुसंन्याशाला वा भुकेल्या वाटसखूला तो कधी एक मूठभरदेखील भिक्षा देत नाही. तो दुकानावर असला म्हणजे इच्छा असूनहि मी कोणाला कांही देऊ शकत नाही. मी तुला सांगून ठेवतें, त्याने जर तुला विचारलें की भाकर कणीं दिली तर खुशाल सांग की पीठ तूंच विकत घेतलें आणि भाकऱ्या तेवढया मीं करून दिल्या. त्याला जर कां कळलें मी आपणहून तुला जेवायला दिलें तर तो माझ्यावर खूप खवळेल. “ असें म्हणून ती तडक तेथून निघून गेली. तिचें तें बोलणें एकून मी भराभर गळधाखाली घास लोटू लागलीं. वाटले, तो यायच्या अगोदर खाणें संपले तर ठीक, नाहीतर तो कांहीतरी विचारेल आणि मी गडबडन जाईन. एकीकडे खोटे बोलण्याचें पाप आणि खरें बोललों, तर तिकडून, जिने आईच्या वात्सल्याने खाऊं घातलें त्या अन्नपूर्णचा अपमान. तो आला तेव्हा डोक्यावरल्या भा-यामुळे त्याचें माझ्याकडे लक्ष गेलें नसावें. तो सरळ दुकानांत शिरला आणि मग बराच वेळ बाहेर आळाच नाही. माझेंहि सर्व आटोपलेंच होतें. लवकरच त्या बाईचें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now