बाळमन | Baalman

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाळमन  - Baalman

More Information About Author :

No Information available about म. का. कारखनीस - M. Ka. Karkhanees

Add Infomation AboutM. Ka. Karkhanees

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मल्ुष्याची बाल्यावस्था ७ 'पति व पत्नी हीं एकत्र राहूं लागलीं. मचुष्याच्या अंतःकरणांत प्रेम, सहानु- भूति, आदर, पूज्यभाव, कृतज्ञता वगैरे अनेक उच्च मनोडृत्तींचें बीज ठेविलें आहे. त्यांचा विकास व परिपोष होण्याला या ग्रहस्थाश्रमाची फार मदत झाली आहे. या उच्च मनोवृत्तीच्या विकासामुळेंच मनुष्याची आध्यात्मिक सुधारणा होत गेली. आपल्या मुलाला सुख लाभावे याजकरितां पति व पत्नी कष्ट करून संपत्ति उत्पादन करूं लागलीं व साठवूं लागलीं. संपत्तीच्या आहे- मुळें मनुष्यप्राण्याची भौतिक सुधारणा होत गेली. त्याच्या ज्ञानांत भर पडत गेली व तो सुधारणेच्या निरनिराळ्या अवस्थांतून पुढें जात चालला. सारांश, अपल्यप्रेम हें सर्व मानवी समाजाच्या सुधारणेचे बीज आहे. बालक जन्मतांच अतिशय दुर्बल असल्यामुळें व त्याच्या बाल्याचा काळ फार मोठा असल्या- मुळेंच आई व बाप यांनीं ग्रहस्थाश्रम स्वीकारून अपत्यसंगोपनाची जबाब- दारी पतकरली व या कालापासून मनुष्याच्या आध्यात्मिक व भौतिक सुधार- णेस प्रारंभ झाला. आपण वर पाहिलेच आहे कीं, बाल्य हा शिक्षणाचे दृष्टीने अत्यंत मह- तत्वाचा काल आहे. या वयांत मुलाला जं द्यारीरिक, बौद्धिक व नैतिक शिक्षण मिळतें त्याजवरच त्याचें पुढील आयुष्य अवलंबून असतें. मुलाला दिक्षण देणें म्हणजे मुलांत बीजखूपानें ज्या द्यारीरिक व मानसिक शक्ति आहेत त्यांचा योग्य विकास करणें होय. मुलांच्या शिक्षणाचें काम आईबाप व शिक्षक यांना करावयाचें असतें. बालमनाच्या स्वरूपाची व त्याच्या कार्यांची थोडीशी तरी माहिती असल्याशिवाय बालशिक्षणाचें हॅ पवित्र व महत्त्वाचें कार्य समाधानकारक रीतीनें पार पडणें शक्‍य नाहीं. मुलाचा शेशवावस्थेचा काळ तर फारंच महत्त्वाचा असतो. याच काळांत शारीरिक, बौद्धिक व नैतिक दिक्षणाचा पाया घातला जातो. या वयांत बालमनाचें स्वरूप कसें असतें, त्याचा विकास कसा होत जातो व तें कार्य कसें करतें याचा थोडक्यांत या पुस्तकांत बिचार करण्याचें योजलें आहे. पुढील भागांत छोस्या बाबूच्या बास्शापासून त्याच्या मनाच्या विकासाच्या वर्णनास प्रारंभ केला आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now