हरी नारायण आपटे | Hari Narayan Aapate

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hari Narayan Aapate  by म. अ. करंदीकर - M. A. Karandeekar

More Information About Author :

No Information available about म. अ. करंदीकर - M. A. Karandeekar

Add Infomation AboutM. A. Karandeekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
6 हरि नारायण आपटे नसे. आता त्याची चुलत आजी आपटयांचे घर मोठय़ा काटकसरीने चालवीत होती. किंबहुना साऱ्या घरात तिचा अंमल होता म्हणांना हरी आता सोळावे वर्ष पूर्ण करण्याच्या बेतात होता आणि त्या काळच्या पद्धतीनुसार लग्नाला योग्य झाला होता. त्याचे शेजारी श्री. दामोदरपंत गोखले यांच्या मुलीशी मथूशी त्याचा वाडनिश्चय तर झालेला होता आणि आता लग्नाची तारीखही ठरली,१६ मे १८७९ ही ती तारीख होय. हरीच्या आजीच्या सक्त आज्ञेमुळे ,त्या वेळच्या प्रथेच्या विरूद्ध,हुंडा घेतला गेला नव्हता. गोखले कुटुंबाने साऱ्या नातेवाईकांचा भरपूर मानपान करून लग्नसमारंभ मोठया थाटामाटात पार पाडला. यापुढे हरीला सर्वजण 'तात्या' म्हणून संबोधू लागले, ' नव्या घरी,म्हणजे सासरी नववधूची म्हणजेच मथूची फारप्रशंसा होई.लहान मुलगी म्हणून ती आपल्या आई-वडिलांचीही लाडकी होती. ती संध्याकाळी त्यांच्या घरी जाई आणि दुसरे दिवशी सकाळी परते. थोडेफार अपवाद वगळता,हे चक्र पाच वर्षापर्यंत चालले.या पाच वर्षात दोन्ही घरचे सणवार उत्साहाने साजरे झाले. मथूला अशा घरकामाची सवय नव्हती आणि म्हणून ते शिकण्यास तिला वेळ लागल्याने घरातील अन्य सुनांच्या तुलनेत ती मागे पडे. पण सामान्यपणे या तिच्या उणेपणाकडे दुर्लक्ष केले जाई. आता आपल्याला हरीच्या विचाराचा परिचय होणे शक्य आहे. आपल्या बायकोला लिहा-वाचायला आणि थोडी आकडेमोड करायला यावे असे त्याला वाटत होते.पण ती तर पूर्ण निरक्षर होती .जर भारताची सांस्कृतिक प्रगती व्हावयाची असेल तर खियांना निरक्षर ठेवणे योग्य नव्हे याची त्याला जाणीव झाली होती. चालू शिक्षणपद्धती सुरू होण्याआधी भारतीय स्त्रिया पूर्णपणे अशिक्षित नव्हत्या. फक्त शिक्षणाचे मार्ग आणि त्याचे ध्येयही निराळे होते.त्यांना आपल्या कर्तव्याची जाण असे.त्या उत्तम गृहिणी होत्या,तसेच बोलण्याचालण्यात सभ्य आणि चतुर होत्या आणि उच्च प्रकारच्या सुसंस्कृतही होत्या. भले त्यांना आधुनिक विज्ञान इतिहास आणि भूगोल यांची माहिती नसेल. हे सिद्ध करण्यासाठी इतिहासातील उदाहरणे देण्याची गरज नाही. मिलच्या “सबजेक्शन ऑफ वूमेन “ यासारख्या पुस्तकांच्या वाचनाने आपल्या स्त्रियांना आधुनिक अर्थाने सुशिक्षित करावे, त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव द्यावी या बाबत सुशिक्षित तरूणांच्या इच्छेला धार आली होती. मिलच्या विचारांचे हरीला फार मोठे आकर्षण होते. त्यांच्या समोर त्यांच्या कॉलेजमधील एका वर्गमित्राच्या बायकोचे सो. काशीबाई कानिटकर यांचे उदाहरण होते. घरातील सनातनी स्त्रियांच्या विरोधाला न जुमानता पण घरातील कामकाजाची कर्तव्य पार पाडून त्या आपल्या पतीच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now