विठ्ठळ रामजी शिंदे | Vitthal Raamaji Shinde

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विठ्ठळ रामजी शिंदे  - Vitthal Raamaji Shinde

More Information About Author :

No Information available about गो. मा. पवार - Go. Ma. Pavaar

Add Infomation AboutGo. Ma. Pavaar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३. धर्मशिक्षण आणि धर्मकार्य विठ्ठल रामजी शिंदे हे ऑक्सफर्ड येथील मंचेस्टर कॉलेज या युनिटेरिअन धर्ममताच्या कॉलेजमध्ये धर्मशिक्षण घेण्यासाठी १९ ऑक्टोबर १९०१ रोजी दाखल झाले. भारतामध्ये ज्याप्रमाणे बाह्य अथवा प्रार्थना समाज या उदार धर्मसंस्था हिंदू धर्मातून विकास पावून एकेश्वरी उदारमतवादी सार्वत्रिक धर्माचे कार्य करू लागल्या त्याचप्रमाणे युनिटेरिअन धर्ममताचे थोडक्यात वैशिष्ट्य सांगायचे झाले तर असे म्हणता येईल,की सनातन खिस्ती धर्म पितादेव, पुत्रदेव (येशू ख्रिस्त) व पवित्र आत्मा ही त्रयी मानतात, तर परमेश्वर हा सर्वतोपरी एकच असून ख्रिस्त हा केवळ अतिपवित्र साधुपुरुष,पण इतरासारखा मनुष्य होता असे या धर्ममताचे लोक मानतात. भारतीय अथवा पाश्चात्य एकेश्वरी सार्वत्रिक धर्म आधुनिक शास्त्र, तत्त्वज्ञान व विचारपद्धती यांच्याशी सुसंगत राहून धर्मकार्य कंरणारे पंथ आहेत. धर्मप्रचारक पध्दतशीरपणे तयार करण्यासाठी स्थापन केलेले मंचेस्टर कॉलेज हे एक नमुनेदार कॉलेज आहे. एकेश्वरी उदारमतवादी धुरीणांनी हे कॉलेज काढले असले तरी त्यामध्ये एका विशिष्ट धर्ममताचा आग्रह नाहो. “सत्य, स्वातंत्र्य व धर्म यांना वाहिलेले” असे या कॉलेजचे ब्रीद आहे. शिकणा-यांच्या विचारांना चालना देणे, धर्मविचाराच्या बाबतीत त्यांची मते मुक्त होतील असा प्रयत्न करणे हे या कॉलेजचे धोरण आहे. तेथील अध्यापकवर्गही सामान्यत: आधुनिक मताचाच असला,तरी एखादा प्राध्यापक जुन्या मताची कदर करणाराही असे. विठ्ठल रामजी ज्या वेळी या महाविद्यालयात गेले त्यावेळी त्यांना प्रो. अँप्टन हे तत्त्वज्ञान, प्रो.कार्पेंटर हे तुलनात्मक धर्म व पाली भाषा, प्रो. ऑजर्स हे खिस्ती संघाचा इतिहास प्रो. जॅक्स हे समाजशास्त्र, हे विषय शिकविणारे व्यासंगी प्राध्यापक होते. प्रिन्सिपॉल डूमंड हे बायबल आणि धर्मशास्त्र शिकवीत. प्रो. कार्पेंटर हे विठ्ठल रामजीचे विशेष गुरू होते. त्यांच्याजवळ त्यांनी तुलनात्मक धर्मशास्त्र या ऐच्छिक विषयाचा व पाली भाषा आणि बौ ध्द धर्म यांचा विशेष अभ्यास केला. हे सगळेच प्राध्यापक त्यांच्या त्यांच्या विषयाचे व्यासंगी अभ्यासक होते,तसेच वृत्तीने धर्मशील व स्वभावाने प्रेमळ होते. हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना आळीपाळीने आपल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now