भारतातीळ बहादुर मुळे | Bhaarataatiil Bahaadur Mule

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaarataatiil Bahaadur Mule by जगदीश काबरे - Jagdeesh Kabareसिगरुन श्रीवास्तव - Sigarun Srivastav

More Information About Authors :

जगदीश काबरे - Jagdeesh Kabare

No Information available about जगदीश काबरे - Jagdeesh Kabare

Add Infomation AboutJagdeesh Kabare

सिगरुन श्रीवास्तव - Sigarun Srivastav

No Information available about सिगरुन श्रीवास्तव - Sigarun Srivastav

Add Infomation AboutSigarun Srivastav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२. एका क्षणाची कहाणी आज गोविंदन्‌ सारखा शाळा सुटायची वाट पाहत होता. त्याला आज शाळेचा कंटाळा आला होता अशातला भाग नव्हता, पण आज त्याला नटराजनूच्या देवळात जायचं होतं. गोविंदन्‌, तमिळनाडूमधील कुरूबारपल्ली गावातील हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात होता आणि तो त्या वर्गांचा मॉनिटरही होता. त्याला ती शाळा खूपच आवडत होती आणि त्याच्या इंग्रजीच्या शिक्षिका, शित्रालेहांचा तर तो लाडका विद्यार्थी होता. गोविंदनूला फिरायला आणि नवनवीन वस्तूंचा शोध लावायला खूप आवडत असे. अशा या शोधक मुलाला गावातील जुनं नटराज मंदीर म्हणजे मेजवानीच होती, मग तिथे जाण्यासाठी तो किती बरं उत्सुक असेल ? नटराजन्‌ मंदीराचे बांधकाम पल्लुववंशी राजांनी केले होते. शाळा सुटल्यानंतर गोविंदन्‌ त्याच्या मित्राबरोबर - रविबरोबर ह्याच देवळात जाणार होता. . ' गोविंदन्‌ *' श्रीमती शित्रालेहांचा आवाज कानावर पडल्याबरोबर स्वप्ननगरीत हरवलेला गोविंदन्‌ घाबरला आणि उगाचच स्वत:चे केस नीट करू लागला. बाईची नजर अजून आपल्यावरच खिळलेली आहे हे पाहून खजील होऊन तो म्हणाला, *' येस, मॅडम ? '' ह्या वह्या घे आणि माझ्या घरी देऊन टाक. आता शाळा सुटणारच आहे. तू लगेच नीघ. गोविंदनूने त्याचं दप्तर घेतलं आणि वर्गातून निघायच्या आधी त्याने रबिकडे पाहिलं आणि त्याला डोळ्यांनीच खुणावलं, *' तिथेच भेटू. ''.त्या दोघांचा नेहमीचा अड्डा होता ' जानकीरामन्‌ स्वीट कोकोनट स्टॅन्ड, *




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now