उद्योगी व्हा | UDYOGI WHAA

UDYOGI WHAA by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuhहृषिकेश गुप्ते - HRISHIKESH GUPTE

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

हृषिकेश गुप्ते - HRISHIKESH GUPTE

No Information available about हृषिकेश गुप्ते - HRISHIKESH GUPTE

Add Infomation AboutHRISHIKESH GUPTE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जातात. त्यांना हार्मीनियम, पियानो वाजवता येत असे. कांगदी पवनचक्क्या बनवणे, लोकनृत्य, भारतीय नृत्य, कठपुतळी तयार्‌ करणे या कलाही त्यांना अवगत होत्या. बागकाम, माळीकाम, शिल्पकला, शिवणकाम, कुंभारकाम या गोष्टीही त्यांना अवगत होत्या. या साऱ्या छोट्या-मोठ्या कलाकौशल्यांवरील प्रभुत्वासोबत लहान मुलांना शिकवणाऱ्या; नव्हे कोणत्याही वयोगटाला शिकवणाऱ्या शिक्षकाकडे सामान्यज्ञानाचे भांडार हवे. जगाकडे पाहण्याची चौकस वृत्ती हवी. श्रीमती वेबर यांची शाळा जेवढी सुंदर, जेवढी जिवंत होती तेवढीच तेथे शिकणारी मुले जीवनरसाने सळसळलेली असत. जंगलातल्या, फेसाळणाऱ्या समुद्रावरच्या किंवा त्यांच्या भोवतांलच्या व्यवहारी जगातल्या कोणत्याही ठिकाणच्या सहली मुलांना जीवनाचा, निसर्गाचा अगदी जिवंत अनुभव देत. मुलं जे प्रश्‍न विचारतात, त्या प्रश्‍नांच्या पाठपुराव्यातूनच खरे तर त्यांना पुढे बरेच शिकायला मिळते. 'मुले विचार करू शकत एकदा सर्व प्राण्यांना, आपण आपल्या वाढत्या दैनंदिन समस्यांना तोंड देण्यासाठी काहीतरी करावे असे बाटले. एकत्र जमले असता या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी शाळा सुरू करण्याचे ठरवले. अभ्यासक्रमात धावणे, चढणे, पोहणे आणि उडणे या गोष्टींचा समावेश होता. अर्थात, या गोष्टी प्राण्यांचा मूळ स्वभावच असल्याने सर्व प्राण्यांनी सर्व गोष्टी कराव्या असे त्यांचे एकमताने ठरले. बदकाने पोहण्यात मोठे यश मिळवले. इतके, की ते त्याच्या शिक्षकांच्याही पुढे गेले! उडण्यातही त्याला बरे गुण मिळाले. मात्र, धावण्यात ते पार मागे पडले. धावण्यात मागे पडल्यामुळे धावण्याचा जास्त सराव करण्यासाठी त्याला शाळा संपल्यावर जास्त वेळ थांबण्यास सांगण्यात आले. धावण्याकडे जास्त लक्ष पुरवावे म्हणून त्याच्या पोहण्यावरही बंधने आली. शिक्षकानी त्याच्याकडून धावण्याचा एवढा सराव करून धेतला, की त्यामुळे त्याच्या पायांचे पडदे फाटले आणि त्याला धडपणे पोहताही येईना. पोहण्यात अव्वल असणारे बदक आता त्यात अत्यंत सामान्य ठरले; पण शाळांमधून सामान्य असणे चालणारे होते, त्यामुळे बदक वगळता कुणीही याकडे फार लक्ष दिले नाही. सशाने पळण्यात नंबर मिळवला; पण त्याच्या नावडत्या विषयात म्हणजेच पोहण्यात मागे पडल्यामुळे पोहण्याच्या अतिसरावाचा ताण पडून तो बिच्चारा मनाने खचूनच गेला. प्राण्यांची शाळा : एक बोधकथा नाहीत कारण त्यांना वस्तुस्थिती माहीत नसते , या समजाची वेबश यांच्या शाळेने अक्षरश: थट्टा उडवली. मुलांना सभोवताल न्याहाळण्याची सवय असते, इच्छा असते. सभोवतालचे जग कसे चालते याबाबतची जिज्ञासाच त्यांना वस्तुस्थितीचे, वास्तवाचे ज्ञान देते. श्रीमती वेबर यांना मुलांचे शिक्षण, अभ्यासक्रम त्यांच्या पद्धतीने देण्याची मुभा, स्वातंत्र्य होते हे येथे किती महत्त्वाचे ठरते! अर्थात, त्यांनी स्वत:च्या अशा काही वेगळ्या कल्पना राबवल्या, ज्या इतरांपेक्षा जास्त यशस्वी ठरल्या, कारण त्यांच्यावर वेबर यांनी जास्त भर दिला. काही कल्पना मुलांनी स्वत:च्या म्हणून स्वत:च राबवून घेतल्या. वर्षानुवर्षे वापरली जाणारी तीच ती पुस्तके , त्याच त्या गोष्टी पुन:पुन्हा करण्याचे बंधन त्यांच्यावर नव्हते ही गोष्टही येथे महत्त्वाची आहे. यामुळेच खरे तर श्रीमती वेबर शिक्षादानाच्या या कामात कायम नवनवी क्षितिजे, प्रदेश धुंडाळत राहिल्या. त्यांचा उत्साह, कुतूहल नेहमीच ताजे राहिले. हाच ताजेपणा, हाच उत्साह नंतर त्यानी त्यांच्या विद्यार्थ्यांत रुजवला. ( माय केट्री स्कूल डायरी या पुस्तकातील जॉन होल्ट वांच्या प्रस्तावनेतून) खारीने झाडावर चढण्यात सर्वांना मागे टाकले; पण तिला उडायला शिकवताना तिच्या शिक्षकांनी तिच्याकडून झाडाच्या शेंड्यावरून खाली जमिनीवर उड्या मारून घेतल्या. जमिनीवर पडून तिचं अंग चांगलंच शेकून निघालं. शेवटी ज्या विषयात तिला 'अ बर्ग मिळायचा त्या झाडावर चढण्यात आता तिला 'क' वर्ग मिळाला, तर उडण्यात 'ड' वर्ग मिळाला. तिने एकूण काहीही शिकण्याचा धस्काच घेतला. शिस्तीच्या बाबतीत गरुड शाळेतला सर्वात वाईट विद्यार्थी ठरला. झाडाच्या शेंड्यावर पोहोचण्याच्या शर्यतीत त्याने प्रथम क्रमांक मिळवला; पण यासाठी त्याने स्वत:चे उडण्याचे कौशल्य बापरले. उंदरांनी शाळेत न जात शाळेबाहेरच राहून शिक्षणावर लादण्यात येणाऱ्या कराविरोधात लढा उभारला. ते शाळेत गेले नाहीत, कारण अभ्यासक्रमात जमीन उकरणे या विषयाचा समावेशच नव्हता. पुढे उंदरांनी स्वत:च पुढाकार घेऊन मोठ्या प्रयत्नांनी त्यांच्या मुलांना शिकवले व इतर जातीतल्या उंदरांसोबत पर्यायी शिक्षण देणारी एक नवी खाजगी शाळा उघडली. (टोरोन्टो विद्यापीठातील एका अनामिक विद्याथ्यानि लिहिलेली बोधकथा. अन सायर वाईजमन यांच्या मेकिंग थिंग्ज यधून साभार. )
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now