विज्ञानाचा रंजक शोध | VIGYAN RANJAK SHODH

Book Image : विज्ञानाचा रंजक शोध  - VIGYAN RANJAK SHODH

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विनय आर० आर० - VINAY R. R.

No Information available about विनय आर० आर० - VINAY R. R.

Add Infomation AboutVINAY R. R.

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हेडफोन कानाला लावून गाणी ऐकणाऱ्यांना बहिरेपण लवकर येते. एकाच जागी बराच वेळ उभे राहणाऱ्या व्यक्तींनी बुटात बोटांच्या हालचाली केल्या पाहिजेत. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लोक रंगीत कपडे वापरणे पसंत करतात. हमरस्त्याच्या कडेला पिवळे-काळे पट्टे रंगविलेले असतात. फोनवर हळू आवाजात बोलणे चांगले. सतत एकच एक पीक काढल्यावर जमिनी नापीक होतात. घनदाट अरण्यातील झाडे उंच वाढतात. घराच्या आतल्या भिंती गुळगुळीत करतात तर बाहेरच्या खडबडीत करतात. स्वच्छतेचा अतिरेक करणाऱ्यांना पचनाचे रोग होण्याची शक्यता जास्त असते. हिवाळ्यात अनेकांची त्वचा फुटते. साप नागमोडी चालतो. केक, ब्रेड, इडली सच्छिद्र असतात. उकळत्या पाण्यात साखर टाकल्यास उकळी क्षणभर थांबते. थंडीत खोबरेल तेल गोठते, मात्र शेंगदाणा तेल गोठत नाही. नुसते ओतण्यापेक्षा बाटली हलवून घेतल्यास केचप सहजपणे ओतता येते. हरभऱ्याच्या झाडावर आंब येते. झोपडपट्टीवासीयांमध्ये “स्वाइन फ्लूचे प्रमाण कमी आढळले. कोणत्याही संख्येला शून्याने भाग देता येत नाही. संगणकामध्ये स्क्रीन सेव्हर वापरतात. हलवा काटेरी असतो. छापील कागदात घेऊन तेलकट पदार्थ खाऊ नयेत. ई-मेल पत्त्यामध्ये '(८' हे चिन्ह असतेच. शस्त्रक्रिया करताना डॉक्टर नाकातोंडावर कापडी मुखवटा लावतात. हिंदू पंचांगात कधी कधी वर्षात १३ महिने येतात. आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यावर ते गोड लागते. कंकणाकृती सूर्यग्रहण फारच कमी वेळा दिसते. माणसाचे हात चालताना खाली तर पळताना वर असतात. बोटे मोडताना कड कड आवाज येतो. विज्ञानाचा रंजक शोध / ३० हत्ती आपले कान सतत हलवत असतो. मी कोण? माझ्या डोक्यावर सफरचंद पडले आणि मी त्यातून एक शोध लावला. मी, माझा नवरा, माझी मुलगी, माझा जावई, सर्वच नोबेल पारितोषिक विजेते आहोत. माझा शोध एका सूर्यग्रहणाच्या वेळी विजयदुर्ग येथे केलेल्या प्रयोगात लागला. ट्यूब रेल्वेतून प्रवास करताना मला एक स्वप्न पडले की एक साप स्वत:चीच शेपूट गिळत आहे. गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशही ओढला जातो असे मी सांगितले. एका सूर्यग्रहणात काहींनी ते फोटो काढून सिद्ध केले. मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. मुळे नसली तरी फांद्यांतून पाणी वर चढते हे मी सिद्ध केले. झाड, त्यावरचा मोर, जमिनीवरचा साप यांच्याकडे पाहून मी एक गणिती प्रमेय सांगितले. माझ्या मृत्यूनंतर तेरा वर्षांनी माझ्या कल्पनेतील “मोल'ची संख्या मोजली गेली. मी बनारसचा रहिवासी. मी आठ प्रकारच्या तीनशे शस्त्रक्रियांविषयी ग्रंथ लिहिला. पारा माझा फार आवडता. त्यापासून बनलेल्या पदार्थांचा अभ्यास करून मी रसायनशास्त्राचा पाया रचला. सविस्तर उत्तरे लिहा. टोक, शेंडा, शिखर, कड, बाजू, धार या शब्दांचे नेमके अर्थ काय? आपल्या पिण्याच्या पाण्यात क्षार आहेत का हे कसे तपासता येईल? आगगाडीचा वेग आणि समुद्रातील जहाजाचा वेग मोजणे यात फरक काय? माणूस वगळता प्राण्यांना गरजेच्या न वाटणाऱ्या पाच महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? गाईगुरांना चारायला नेणे किंवा जागेवरच चारा देणे यातील फायदे-तोटे यांची तुलना करा. आत्ये-मामे भावंडांमध्ये विवाह होऊन त्यांना अपत्य झाल्यास त्या अपत्यात त्याच्या सामायिक पणजीची किती टक्के जनुके असतील? आत्याच्या सासूच्या विज्ञानाचा रंजक शोध / ३१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now