राजकन्येला हवा चन्द्र | THE PRINCESS AND THE MOON

Book Image : राजकन्येला हवा चन्द्र  - THE PRINCESS AND THE MOON

More Information About Authors :

जेम्स थर्बर -JAMES THURBER

No Information available about जेम्स थर्बर -JAMES THURBER

Add Infomation AboutJAMES THURBER

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विदूषक शांतपणे विचार करत होता. तो म्हणाल, “आपले विद्वान चंद्राला लपवू शकत नाहीत याचा अर्थ चंद्र लपूच शकत नाही.” राजाने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला आणि आवंढा गिळला. नंतर त्याने खिडकीकडे पाहिले आणि तो ओरडलाच, “ते बघ! राजकन्येच्या खिडकीतून दिसण्याइतका चंद्र वर आला आहे. अरे देवा, आता मी काय करू? कोण माझ्या मुलीला समजावेल? चंद्र आकाशातही चमकतो आहे आणि त्याचवेळी तिच्या गळ्यातही सोनसाखळीत लटकतो आहे. हे कसं शक्य आहे?” विदूषकानं हातातली वीणा खाली ठेवली. राजाला समजावत तो म्हणाला, “आपल्या विद्वानांच्या मते चंद्र खूप लांब आणि मोठा होता. त्याला आणणं शक्‍य नव्हतं. पण आपल्या राजकन्येनं हा प्रश्‍न स्वत:च सोडवला की नाही? म्हणजे ती आपल्या विद्वानांपेक्षा जास्त हुशार आहे. हा दोन चंद्राचा प्रश्‍नही तीच सोडवेल, मी तिलाच विचारून येतो.” असं म्हणत विदूषक राजकन्येच्या महालात गेला. राजकन्या आपल्या पलंगावर पहुडली होती, पण जागीच होती. ती आकाशातल्या चंद्राकडे पहात होती. तिच्या हातात विदूषकानं बनवलेला छोटा चंद्र होता. विदूषकाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने राजकन्येला विचारले, “बाळ मयूरी, आकाशातही चंद्र आहे आणि तुझ्या गळ्यातही चंद्र आहे. हे कसं शक्य आहे?” राजकन्या विदूषकाकडे बघत जोरात हसली आणि म्हणाली, “हात तिच्या, त्यात काय एव्हढं, आज आकाशात नवीन चंद्र शद




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now