जोतिचरित्र | JYOTI CHARITRA

JYOTI CHARITRA  by पुस्तक समूह - Pustak Samuhलक्ष्मणशास्त्री जोशी - LAXMANSHASTRI JOSHI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

लक्ष्मणशास्त्री जोशी - LAXMANSHASTRI JOSHI

No Information available about लक्ष्मणशास्त्री जोशी - LAXMANSHASTRI JOSHI

Add Infomation AboutLAXMANSHASTRI JOSHI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
24 जोतिचरित्र साली नष्ट केली. या थोर मानवी स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांपासून स्फूर्ती घेऊन जोतीरावांनी आपला ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंना अर्पण केला. गुलामगिरी” या ग्रंथाचा प्रारंभ होमरच्या प्रसिद्ध वाक्याने झाला तो असा, **ज्या दिवशी मनुष्य दास होतो, त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो.*' हा ग्रंथ पश्नोत्तररूपात आहे. त्यात सोळा प्रकरणे आहेत. पहिल्या नऊ प्रकरणात भारतातील ब्राह्मणी वर्चस्वाचा इतिहास आहे. जोतीराव आत्मविश्वासपूर्वक त्यात म्हणतात- “'गूद्र लोक हेच या देशाचे जीवन आहे. आर्थिक व राजकीय संकटांच्या वेळी सरकारने त्यांच्यावर अवलबूंन राहावे, ब्राह्मणांवर नव्हे. जर गृूद्वांच्या मनात सुख, समाधान निर्माण केले; तर त्यांच्या निष्ठेविषयी सरकार साशंक राहणार नाही.” यास्तव जोतीरावांनी सार्वजनिक शिक्षणाविषयी मागणी केली. जोतीरावांनी जो द्वाह्मणांचा व आर्यांचा इतिहास लिहिला, तो काल्पनिक आहे ! ते संशोधक नव्हते; भाषादाखल्ञ नव्हते; परंतु सामाजिक क्रांतीचे पुरस्कते होते. जोतीरावांनी “गुलामगिरी” या ग्रंथात आपल्या ग्रंथाचे प्रयोजन सांगितले आहे ते असे की-- “ब्राह्मण लोक तुम्हाला छुटून खात आहेत, हे माझ्या शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा प्रस्तुत ग्रंथ लिहीत आहे.” अमेरिकन संस्थानातील निग्रो लौकांच्या स्वातंत्र्यासाठी जो मोठा लढा झाला, त्यापासून सामाजिक न्यायासाठी झगडण्याची स्फूर्ती जीतीरावांनी घेतली. छोकहितवादींवरही अमेरिकन स्वातंत्र्य- समराचा परिणाम झालेला दिसतो. जेव्ह हिंदू स्वतःचे राज्य करण्यास पात्र होतील, तेव्हा ब्रिटिद्यांनी त्यांना सत्ता दिली नाही तर, जसे अमेरिकेत घडले तसे हिंदुस्थानात घडेल, असे त्यांनी भाकीत केले होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्य समराचा व गुलामगिरी नष्ट करण्याच्या जाहीरनाम्याचा जोतीरावांच्या पिढीवर फार मोठा परिणाम झाला होता. “गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून झाल्यावर जोतीरावांनी सार्वजनिक चळवळीस आरंभ करण्याचा निर्धार केला. ग्रंथ पुरा होण्यापूर्वी जाहीर सभा, पत्रके व पुस्तिका याद्वारे ते आपले विचार व्यक्त करीत होत. आपली चळवळ संघटित करून आपला संदेश सर्व ठिकाणी पोचवावा, अद्या निर्धाराने व ध्येयाने त्यांनी सत्यशोधक समाज स्थापला, समाजसुधारणेची महाराष्ट्रातील ही पहिली चळवळ. या समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून जोतिराव ठरले. नारायणराव गोविंदराव कडलग यांची कार्यवाह म्हणून निवड झाली. शूद्रांना व अतिग्ूद्वांना नागरी हक्क जाणीव व अधिकारांची शिकवणूक व ब्राह्मणी शास्त्रांच्या धार्मिक व मानसिक गुलामगिरीतून मुक्तता हे सत्यशोधकाचे ध्येय होते. या समाजाचे सभासद होताना शपथ ध्यावी लागे. खंडेराव या दैवतापुढे बेळपत्र उचलावे लागे. इंग्रज सत्तेशी निष्ठेने वागेन, अशी दापथ घ्यावी लागे. सत्यशोधक . समाजानंतर बत्तीस वर्षांनी स्थापन झालेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजाने ब्रिटिशांचा हिंदुस्थानशी आलेला संबंध हय देवाच्या अतर्क्य कृपेमुळे आला असे ब्राह्मण आणि अस्पृश्यता यांना विरोध 25 मानले, त्या काळी शहरातील पाश्चात्य शिक्षण घेतलेले मूठभर लोक राजकीयदृष्ट्या विचार करीत. 1911 साली सत्यशोधक समाजाचे ठराव प्रसिद्ध झाले. त्यात सत्यशोधक समाजप्रणीत महत्त्वाची तीन तत्त्वे सांगितली आहेत. ती अशी : **'(अ) सर्व माणसे एकाच देवांची लेकरे आहेत. (ब) आईला भेटण्यास वा बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची गरज नसते, त्याप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित वा गुरूची आव्यकता नाही. सर्व मानवप्राणी एकाच देवाची लेकरे आहेत, सबब माझी भावंडे आहेत अशा बुद्धीने मी वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती वा ध्यानधारणा करतेवेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही. दुसऱ्यांनाही तसेच वागवण्याबद्दल उपदेदा करीन. आणि (क) मुलामुलींना सुगिक्षित करीन. परमेश्वरास साक्ष ठेवून मी ही प्रतिज्ञा करतो. या प्रमाणे वागण्यास मला सामर्थ्य येईल अशा प्रकारे आयुष्यक्रम गुदरण्यास परमेश्वर सामर्थ्य देवो.”'* “समाजाचे' सभासदत्व सर्व जातीतील लोकांना मोकळे होते. ब्राह्मण, महार, मांग इ, त्या आरंभी समाजाचे सभासद होते. ज्या ठिकाणी समाजाच्या शाखा स्थापण्यात आल्या तेथे दर आठवड्यात सभा होत. पुण्यात सोमवार पेठेत डॉ. गावडे यांच्याकडे सभा होई. तेथे दारूबंदी, सक्तीचे शिक्षण, स्वदेशी वस्तू वापरणे, ब्राह्मणांची पुरोहितगिरी झुगारून देणे, लग्न अल्प खर्चात करण्याची व्यवस्था करणे, ज्योतिष, भुते, समंध यांच्या भीतीपासून लोकांना मुक्‍त करणे इ. वर चर्चा होई. परमेश्वराचे जनकत्व व मनुष्याचे बंधुत्व यावर भर देण्यात येई. प्रार्थना समाज व ब्राह्मयीसमाज हे एकेश्वरी पंथ होते. तसा सत्यशोधक समाजही होता, या तिन्ही संस्थांच्या मते सर्व मानव एकाच देवाची बालके होत. या तिन्ही संस्था दर आठवड्यास सांधिक प्रार्थना ब सभा घेत. राममोहन रॉय यांनी ब्रह्मतत्त्व घेतले. प्रार्थना समाजाने प्रार्थना व जोतीरावांनी सत्य तत्त्व घेऊन कार्याचा पुरस्कार केला. यानंतर दोन वर्षांनी दयानंद सरस्वतींनी आर्य तत्त्वाचा पुरस्कार केला. ब्राह्म व प्रार्थना समाजवादी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत. जोतीरावांचा भर प्रार्थनेवर वा आध्यात्मिक उन्नतीवर नव्हता. जोतीरावांच्या सत्यशोधक समाजाचा जातिव्यवस्थेवर तसाच चातुर्वण्यावरही विश्वास नव्हता. आवशयक असे धार्मिक विधी ठेवून मध्यस्थाची उचलबांगडी त्याने केली. ब्राह्म समाजही जातिभेद पाळत नसे. प्रार्थना समाजाची तत्त्वे एकूण ब्राह्म समाजासारखी होती. या तिन्ही समाजांनी मूर्तिपूजा त्याज्य ठरवली होती. ब्राह्म समाजात ब्राह्मणानेच प्रार्थना सांगण्याचा प्रथम अलिखित नियम होता. त्या मक्तेदारीला केशवर्चद्र सेन यांनी धक्का दिला. ते उत्साही व पक्के सुधारणावादी होते. त्यांनी ब्राह्म समाजाला ब्राह्मणी चिन्हांपासून मुक्‍त केले. म्हणजे यज्ञोपवीतादींचा त्याग केला. 1867च्या जून महिन्यात भिकोबा दादा चव्हाण या भंडारी शिक्षकाने मुंबईतील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now