पाण्याशी खेलूया | CHILDREN AND WATER

CHILDREN AND WATER  by जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEESTपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

No Information available about जोस एलस्टगीस्ट -JOS ELSTGEEST

Add Infomation AboutJOS ELSTGEEST

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बर्फ क्म ' पाणी आणि शाळे थंडगार बर्फ थोडा वेळ नुसता ठेवून दिला की त्याचं पाणी होतं. थोडसं पाणी ताटलीत ठेवलं तर दुसऱ्या दिवशी ते कमी झालेलं दिसतं. पाणी उकळत ठेवलं तर त्याची वाफ होताना दिसते. याच्या उलटही करता येतं. उकळणाऱ्या पाण्याच्या भांड्यावर थंड पाण्याने भरलेली ताटली झाकण ठेवली तर तिच्या तळाशी वाफेचं परत पाणी झालेलं दिसतं. पाणी धी फ्रीजरमध्ये गार केलं की गोठतं - बर्फ होतं. थंड पाण्याचं, बर्फाचं आणि उकळत्या पाण्याचं, वाफेचं तापमान मोजणं हा चांगला प्रयोग आहे. मात्र प्रयोग करताना कोणा मोठ्या माणसांच्या सोबत करा. बर्फ आणि वाफेमध्ये असलेल्या पाण्याच्या तापमानाचं काय होतं ? एका भांड्यात बर्फाचे तुकडे आणि पाणी घेऊन सुरुवात करा - त्यात एक तापमापी ठेवा न - प्रत्येक मिनिटाला नोंद घ्या. - तापमान नीट काळजीपूर्वक बघा व नोंदवा. - आता भांडे विस्तवावर ठेवून गरम करा आणि पाणी कमीत कमी पाच मिनिटे उकळू द्या. - आलेख काढा. हा आलेख आपल्याला काय सांगतो ? तापमान --> वेळ (मिनिटात) मुलांना फ्रिजमध्ये बर्फाचे ठोकळे र रे ” (घन) बनवायला खूप मजा येते. बाई, र मी त्यांना आता वेगवेगळ्या गोष्टी बर्फाच्या ड् बनवायला सांगितलं आहे. बर्फाचा चेंडू, बर्फाचे अंडे, बर्फाची अंगठी किवा बर्फाची कोणतीही आकृती ठोकळ्यामधे ब हवेचे बुडबुडे का अडकले आहेत ? २९ बाष्पीभवन आणि वाळवणे कपडे वाळवणं ही एक नेहमीची गोष्ट जू आहे. जेव्हा ओले कपडे वाळतात 5 तेव्हा नेमक काय होतं ? रः वाळणं ह्याचा अर्थ काय ? उ 1 किती ओलं, म्हणजे ओलं म्हणतात? किती कोरडं म्हणजे वाळलेलं म्हणतात ? ओलेपण एका नेहमीच्या तराजूने तुम्हाला ओलेपणा मोजता येतं का ? आणि कोरडेपणा मोजण्याचे एक छान यंत्र को बनवता येईल “$ * तराजूच्या एका बाजूला एक ओला कपडा किवा टिप कागद लटकवा. दुसऱ्या बाजूला वजनं ठेवून तराजू संतुलित करा. वाळताना वस्तूचे वजन कमी होते आणि तराजू असंतुलित होतो. इथे तुम्ही वाळण्याला लागलेला वेळ, पाण्याचे प्रमाण आणि बाष्पीभवनाचा दर मोजू शकाल. कोरड्या वस्तूचे आधी वजन करून घ्या. म्हणजे नंतर तुम्हाला कळेल की त्यामध्ये अजून किती पाणी शिल्ठुक आहे. एक घन से.मी. (मि.ली.) पाण्याचे वजन एक ग्रॅम असते. प्रयोगाच्या घटकांचा विचार करू या प्रयोगाची जागा बदलण्याने फरक पडेल का ? उन्हात ? सावलीत जोरदार वाऱ्यात ? कपाटावर ? कोपऱ्यात ? टेबलाच्या खाली ? कागद किवा कापडाचा आकार ह्यामुळे फरक पडतो का ? गोलाकार ? चौरस ? त्रिकोण ? रिबिनीसारखी पट्टी ? कागदाच्या किवा कापडाच्या क्षेत्रफळाचा वाळण्याच्या वेळेवर परिणाम होतो का? हा प्रयोग करण्यासाठी कापा : एकसारखे आकार, पण वेगवेगळं क्षेत्रफळ. एका समान क्षेत्रफळाचे निरनिराळे आकार. ३०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now