आमादेर शान्तिनिकेतन | AAMADER SHANTINIKETAN
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
350 KB
Total Pages :
118
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आशा साठे - AASHA SATHE
No Information available about आशा साठे - AASHA SATHE
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चढवून ठेवलेले त्यांचे प्रिय आलू दा बसले होते. गोलमटोल असा खास कोणतंही
वैशिष्ट्य नसलेला चेहरा, काचेच्या गोळ्यांसारखे नेहमी चमकणारे डोळे, आणि
विरळ केस यामुळे आलूदांना दुरुनही ओळखता यायचं. आम्हाला पाहताच त्यांचे
डोळे चमकले. त्यांना कल्पना आलीच की आम्ही नक्कीच काहीतरी तक्रार घेऊन
आलो आहोत. त्या काळात एखाद्या खाजगी सचिवाप्रमाणे आलूदा सदैव गुरुजींच्या
बरोबर सावलीसारखे राहात. एवढंच नाही तर ते आश्रमाच्या नाट्यविभागाचे
सुपरिचित, सुप्रतिष्ठित आधारस्तंभ होते. असा जन्मजात कुशल अभिनेता आणि
प्रत्युत्पन्न बुद्धीचा माणूस खरोखरच आज कुठे भेटणं कठीण आहे. त्यांच्याकडे
मोठ्या चांगल्या विनोदी चुटक्यांचा एक मोठ्ठा खजिनाच होता. चुटके सांगून
हास्याची बहार उडवून ते स्वत: मात्र एखाद्या कोपऱ्यात गंभीर चेहरा धारण
करून उभे राहायचे. 'ताशेर देश“मध्ये ज्यांनी त्यांचा असा अभिनय पाहिला
आहे, ते आजही तो विसरणं शक्य नाही.
गुरुदेवांनी मोठ्या आपुलकीने आम्हाला बसवलं. आपल्या प्रिय पुतण्याला
वनमाळीला काचेची बरणी घेऊन यायला सांगितलं. त्यातून आम्हा सगळ्यांना
प्रत्येकी एकेक टॉफी मिळाली. मग येण्याचं प्रयोजन विचारलं, “सांगा, कसं येणं
केलंत? कोणत्या साहित्यसभेचं अध्यक्षपद भूषवायचंय, का पुन्हा तुमच्या कुणा
धोब्याच्या बोटात सुई टोचली आहे? काही दिवसापूर्वीच आमच्या विद्यार्थी
निवासाच्या धोब्याच्या बोटात कुणा विद्यार्थीनीने नकळत रुमालाला खोचून
लावलेली सुई घुसली होती. मग सगळ्या विद्यार्थिनींना इकडे तिकडे धावपळ
करून, वर्गणी गोळा करुन त्याला उपचारासाठी कलकत्त्याच्या हॉस्पिटलमध्ये
पाठवायला लागलं होतं. वर्गणीतील सर्वात जास्त रक्कम दिली होती स्वत:
गुरुदेवांनीच. त्यामुळे त्यांचा तो प्रश्न ऐकून क्षणभर आम्ही शरमिंदे झालो. पण मग
मीच मोठ्ठं धाडस करून आमच्यावर कोसळलेल्या संकटगाथेची प्रस्तावना केली.
*“कसंही करून आम्हाला आलू परवलपासून मुक्ती द्या.”
एकतर आम्हा उत्तरप्रदेशीय विद्यार्थ्यांचे एरवीही खाण्याचे हाल होते. ती
तुरीची डाळ आणि वांगी कशीबशी भुकेल्या पोटी घशाखाली ढकलायचो. त्यात
आता ती आलू परवलची खारट गोड भाजी! '“आज सतत महिनाभर आम्हाला
ते आलू परवल खावे लागताहेत. कोणतीही भाजी घ्या, त्यात आपले ते आलू,
आलू आणि आलच! * आम्ही म्हटलं.
आमादेर शान्तिनिकेतन / १५
User Reviews
No Reviews | Add Yours...