मुलांची भाषा आणि शिक्षक | THE CHILD'S LANGUAGE AND THE TEACHER

THE CHILD'S LANGUAGE AND THE TEACHER  by कृष्ण कुमार - Krishna Kumarपुस्तक समूह - Pustak Samuhवर्षा सहस्रबुध्दे - VARSHA SAHASRABUDDHE

More Information About Authors :

कृष्ण कुमार - Krishna Kumar

No Information available about कृष्ण कुमार - Krishna Kumar

Add Infomation AboutKrishna Kumar

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वर्षा सहस्रबुध्दे - VARSHA SAHASRABUDDHE

No Information available about वर्षा सहस्रबुध्दे - VARSHA SAHASRABUDDHE

Add Infomation AboutVARSHA SAHASRABUDDHE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गोष्टीत जर अगदी मोजक्या व्यक्तिरेखा असतील, तर पाच-पाच मुलांच्या लहान गटांनी नाटुकली सादर करावीत. किंवा वेगवेगळ्या गोष्टी सादर कराव्यात गटागटांमध्ये स्पर्धा लावण्यात काहीही अर्थ नाही. त्यातून फक्त शिक्षकावरचे अवलंबित्व वाढते, अनावश्यक ताणही वाढतो उत्स्फूर्तपणें अभिनय करून काही सादर करण्याची सुरुवात जर लहान वयातच झाली, तर वाचनकौशल्यांचा विकास होण्यासाठी पक्का पाया तयार . होतो. नाटक आणि वाचन यामध्ये अगदी थेट नसला तरी दुवा आहे. शब्द आणि शरीराच्या हालचाली (उदा. वाकणे, हावभाव, इ.) यांचा प्रतिके म्हणून जाणीवपूर्वक वापर करण्याची निःसंदिग्ध संधी नाटकातून मिळते. गोष्ट सांगण्याबरोबरच नाट्यमय कतीमधून मूल प्रतिकात्मक अर्थाने जगात सहभागी होते. (म्हणजे, प्रत्यक्ष आपला संबंध नसलेल्या प्रसंगातही सहभाग घेते.) चांगले वाचंक बनण्यासाठीही हीच क्षमता असावी लागते - प्रत्यक्षात डोळ्यासभीर नसलेल्या गोष्टी डोळ्यासमोर आणण्याची आणि जणू काही त्या प्रत्यक्षातच असल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता. शिक्षकाचा प्रतिसाद मुले शाळेत प्रवेश घेतात त्या सुमारास मातृभाषेतील नूलभूत रचनांवर बहुतेकांनी, विस्मय वाटावा एवढे प्रभुत्व मिळवलेले असते. देवघेवीच्या अनेक प्रसंगी भाषा कशी वापरायची हे तर मुले जाणतातच, शिवाय प्रसंगानुरूप, संदर्भानुरूप भाषा कशी बदलायची हेही मुले जाणतात. श्रोता म्हणून ऐकलेल्या संदेशाचे कृतीत रूपांतर करणे पाच वर्षांच्या मुलांना जमते. (उदाहरणार्थ : सांगितल्यावर पाण्याचा पेला घेऊन येणे आणि तो जागेवर ठेवणे) एवढेच नाही, तर बोलण्यावरून माणसांची व्यक्तिमत्वे, त्यांचे परस्परांशी असणारे संबंध याविषयीचे अचूक आडाखेही मुले बांधू शकतात. या सगळ्या क्षमता आपल्या दिनक्रमातून मुले आपली आपण कमावतात, त्यांना कोणी शिकवत असे नाही. जे जे काही मुलाच्या भोवताली घडते ते ते सर्व काही मुलाच्या अवधानाच्या चाळणीतून जातेच आणि मुलाच्या भाषाविश्वाचा भाग बनते. मुलाने या क्षमता कमावल्या, त्याबद्दल शिक्षक म्हणून आपल्याला आदर वाटायला हवा. अगदी पूर्णपणे नव्याने आपण शिकवावे, असे जवळजवळ काहीच नसते. मुलाजवळ असलेल्याच क्षमता आणखी वाढाव्या याकरता योग्य अशी परिस्थिती तेवढी आपण निर्माण करू शकतो. बोलण्यांच्या संदर्भात अशी परिस्थिती निर्माण करायची, तर मुलाच्या बोलंण्याला आपण काय प्रतिसाद देतो, याबद्दल आपण जागरूक आणि सावध असायला हवे. जेव्हा जेव्हा आपण मुलाचे ऐकू आणि प्रतिसाद देऊ तेव्हा या गोष्टी पाळायला हव्यात १, मुलाला पूर्णपणे बोटू द्या. २. मुलाला जे सांगायचे आहे त्यात रस घ्या. ३. त्याचे बोलणें खोडून काढण्याच्या आपल्या इच्छेवर मात करा. _ ४. फक्त “छान”, 'वा!* किंवा 'असं नाही” असे न म्हणता, मुलाने जे म्हटले असेल, तै अधिक तपशील भरून, अधिक चांगली वाक्यरचना करून म्हणा उदाहरणार्थ, मूल जर म्हणले असेल, झाडावरची खार” तर शिक्षकाचा प्रतिसाद असा काहीसा असू शकेल : “खार झाडावर चढताना दिसली तुला?' ५. अधिक माहिती विचारा, त्याचे विषयाची एखादी नवी बाजू मुलाला दाखवा. या पद्धतीने मुलांशी बोलायचे असेल, तर चांगल्यापैकी सराव हवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणे हे शिकण्यासाठी एक महत्त्वाचे खोत- साधन आहे याविषयीची जाणीव असायला हवी. आणि बोलण्यातून मुलाच्या सामाजिक वर्तनाला, व्यक्तिमत्वाला आकार येत असतो, हे ध्यानात ठेवायला हवे. अगदीच गप्प बसणारी मुले शिक्षकांसाठी विशेष अडचणीची ठरू शकतात, काही मुलांना बोलण्यापेक्षा खेळण्यात, वस्तू बनवण्यात जास्त रस असू शकतो. मात्र, प्रतिसाद देणे, प्रश्न विचारणे, आपण काय करतो आहोत हे इतरांना सांगणे यापैकी काहीही करण्याची एखाद्याला इच्छाच नसेल, तर त्या मुलाकडे विशेष लक्ष देणे अगत्याचे ठरते. घरी विविध प्रकारे त्याच्या बोलण्याच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now