फुलांनी फुलाय्ला हवं म्हणून | HOPE FOR FLOWERS

Book Image : फुलांनी फुलाय्ला हवं म्हणून  - HOPE FOR FLOWERS

More Information About Authors :

ट्रिना पौलोस - TRINA PAULUS

No Information available about ट्रिना पौलोस - TRINA PAULUS

Add Infomation AboutTRINA PAULUS

नीलिमा किराणे - NEELIMA KIRAANE

No Information available about नीलिमा किराणे - NEELIMA KIRAANE

Add Infomation AboutNEELIMA KIRAANE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१.4 मशे आहे तरी काय? ' चं त्याचं कुतूहल वाढत रहायचं एके दिवशी मनोऱ्याकडून तीन जोराचे आवाज आले. पट्ट धावत मनोऱ्याजवळ पोहोचला तर तीन मोठेमोठे सुरवंट मनोऱ्यावरून पडले होते. त्यातले दोन पडताक्षणी गतःप्राण झाले. एवढ्या जोरात आदळले म्हणजे ते अगदी शिखराजवळून - एवढ्या उंचीवरून कोसळले असणार. तिसऱ्या सुरवंटात थोडी धुगधुगी होती. पट्नं त्याला पाणी पाजायचा प्रयत्न केला. विचारलं, '“ काय झालं? ' सुरवंटाला चांगलाच मार बसला होता. त्याला बोलताही येत नव्हतं. कसंबसं तो म्हणाला ““वर शिखरावर - फुलपाखरं - फक्त फुलपाखरंच.... '' आणि तोही सुरवंट शांत झाला पट सुन्न झाला. सरपटत-खुरडत तो घरी आला. सोनाला त्यानं हे सगळं सांगितलं. दोघांनाही कळत नव्हता त्या शब्दांचा अर्थ - फुलयपारखस्न - हे काय असतं? त्या अळ्या पडल्या कशा? अगदी शिखराच्या टोकावर पोहोचल्या असतील का त्या ? आता पट्ट विलक्षणं अस्वस्थ झाला. वर एवढ आहे काय? या प्रश्नानं त्याला रोजचं तेच ते आयुष्य अतिशय कठीण व्हायला लागलं. मनोऱ्याच्या रहस्याचा भेद आपण करायलाच ह्वा हे त्याच्या मनानं पक्कं घेतलं. सोनाची सोबत त्याला सोडवत नव्हती पण ती पुन्हा वर चढायला तयार होईल का? शेवटी एकदा न राहवून त्यानं तिला विचारलं. ““मला वर जायलाच हवं सोना. आता वर काय आहे ते शोधल्याशिवाय मी राहूच शकणार नाही. तू येशील ना?”' सोनाला ठरवता येईना. तिची व्दिधा मनःस्थिती झाली. जमिनीसोबतच्या या सरपटत खुरडत चालण्यातून मुक्ती तिलाही हवी होती. मनोऱ्याचं ढगांतलं शिखर तिलाही मोहवत होतं. पण तिला वाटायचं, एवढं सर्वांना तुडवत जायचं आणि वर शिखरावर कदाचित काहीच नसेल तर? पट्टला मात्र आता हे पटत नव्हतं. एवढे सगळेजण ज्याअर्थी चाललेत त्याअर्थी काहीतरी असलंच पाहिजे. कदाचित तेच ते “जगण्याचं कारण' असेल? “आपण जाऊच या!'' पद पुन्हा सोनाला म्हणाला “नाही पट्ट. शिखरावर जे काही असेल ते कितीही सुंदर आणि महत्त्वाचं असलं तरी त्याच्यासाठी सर्वांना तुडवत-मारत जावं लागणार असेल तर ते चूक नाही का?”' पण पट्ट आता हे काही समजण्याच्या किंवा पटण्याच्या मनःस्थितीत नव्हताच. वर काय आहे ते समजायलाच हवं आणि त्यासाठी आपण वर जायलाच हवं - भले मग ते सर्वांना कुस्करत जावं लागलं तरी - एवढंच त्याला कळत होतं. ““इथे ठेवलंय काय? आपण तेच तेच रोजचं आयुष्य गेले कितीतरी दिवस जगतोय. त्यापेक्षा वर जाऊन पाहू तरी काय आहे तिथे ते !'' ““हे बघ, आपण कुठे आणि कशासाठी चाललो आहोत हे सुध्दा माहीत नसताना इतरांना तुडवत जाणं चूकच आहे. त्यापेक्षा काहीच न करणं जास्त चांगलं वाटतं मला.'' तिनं त्याला समजवण्याचा एक दुबळा प्रयत्न केला. पण पट्ट ऐकणार नव्हताच आता ! “सगळेच तर एकमेकांना तुडवतायत. मग त्यात वाईट आणि चूक असं उरतंच काय, जेव्हा सगळेजण करत असतात तेव्हा? यावर सोनाकडे अर्थातच उत्तर नव्हतं पण तरीही हे बरोबर नाही असं तिला मनोमन वाटतच होतं. -्पवकककककौनिनि”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now