अरुण देशपांडे - माणूस व चलवल | ARUN DESHPANDE - MANUS ANI CHALWAL

Book Image : अरुण देशपांडे - माणूस व चलवल  - ARUN DESHPANDE - MANUS ANI CHALWAL

More Information About Authors :

अनिल अवचट - ANIL AWACHAT

No Information available about अनिल अवचट - ANIL AWACHAT

Add Infomation AboutANIL AWACHAT

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नीट वाढलेल नाही, त्या अर्थी याचा 'प्रोग्रॅम' चांगला नाही. ते मी तोडून टाकणार. आता हे सरळ छान वाढलंय, त्या अर्थी त्याचा प्रोग्रॅम चांगला आहे; ते राहू देणार ?*' ' प्रोग्रॅम ?'' ही अरुणची कॉम्प्युटर परिभाषा असावी. प्रत्येक बी म्हणजे प्रोग्रॅमच असतो. चांगलं प्रोग्रॅमवालं बी, रोप ठेवत गेलो की आपोआपच सगळी झाडं चांगलीच येणार. आता या झाडाचं मी सगळं खोड तोडलंय. तिथं आता ज्या फांद्या फुटल्यात त्यासुद्धा किती रसरशीत आणि सरळ वर जाताहेत बघ. कारण काय ?*' ' प्रोग्रॅमच चांगला आहे !'' मी हसून म्हटलं आणि त्यानंही शिक्षकासारखी मान डोलावली. दाभोलकर त्याला म्हणाले होते, 'चांगली शेती ही चौरस फुटात मोजायची नसते; तर ती घनफुटात मोजायची असते आणि ते घनफूट जमिनीच्या वर जसे असतात तसे जमिनीच्या खालीही असतात.' इथं अरुणनं दाभौलकरांना समाधान वाटेल अशी भरपूर घनफूट शेती करून दाखवलेली दिसत होती. झाडांच्या स्वभावाची अरुणला चांगली समज आहे. तो म्हणाला, “मला आमचे मित्र म्हणत होते, तू नारळ कां लावले नाहीस ? आता मी नारळ लावलेत. कारण भोवती आता सोबतीला त्याच्या इतर झाडं आहेत. आता ते वाढेल. 9 मला ते पटल, कारण कोकणामध्ये गेलो होतो, तिथला माणूस म्हणत होता, ' नारळाचं झाडं फार घाबरट असतं. जवळ दुसरं झाड किंवा इमारत असली तर ते वाकून तिरपं होऊन मग वर जातं.' अरुणच्या कुपणरूपी दाट जंगलातून आम्ही मधल्या मोकळ्या जागेत आलो. आतला प्लॉटही ग्लिरिसिडीयाच्या आडव्या रांगांनी विभागलेला होता. एवढी म्लिरिसिडीया कशाला लावलीय ?*' ' खूप उपयोग आहेत. याच्या पानांमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूपच असतं. झाडांना युरिया द्यायचा कशाला, फॉस्फेट्स घालायची कशाला ? राजस्थानमध्ये रॉक फॉस्फेट हे मातीसारखं मिळतं. इथंही जवळपास मातीमोल भावानं मिळतं. ते झाडाच्या बुंध्याशी टाकायचं. ग्लिरिसिडीयाची पानं, पाचोळा टाकून द्यायचा. एक प्रकारच्या बॅक्टेरियाचं कल्चर आपल्याकडं तयार होतं. सासवडजवळ एकाची फॅक्टरी आहे, ते विरजण आणून घातलं की पुढचं काम सगळ बॅक्टेरिया करतात. ओरे, हे झाडं म्हणजे फर्टिलायझरची फॅक्टरीच आहे. आता फॅक्टऱ्या तरी काय करतात ? रॉ-मटेश्‍ियिलपासून अर्क काढतात, त्यावर रासायनिक प्रक्रिया करतात, त्यातनं प्रचंड पोल्यूशनही करून ठेवतात. ती ट्रान्सपोर्ट करून अनेक पटींनी किंमत वाढवून आम्ही घेतो. त्यापेक्षा आपण या मार्गाने ते डायरेक्ट बॅक्टेरियाच्या साह्याने प्रॅन्युफॅक्चरच करू शकतो ना, अगदी झाडाच्या तळाशी. अरुणच्या घरी लसूण, कडुलिंब आणि तत्सम काही वनस्पतींच्या अर्कांचे द्राव मोठमोठ्या बरण्यांमध्ये ठेवले आहेत. सकाळीच जाधवांना ते मिश्रण रॉकेलमध्ये मिसळून फवारणी करायच्या सूचना देत होता. '*आता या मधल्या रांगा हा सुद्धा माझा 'विंड स्क्रीन आहे. तो छाटणी करून मी कमीजास्तही करू शकतो. मध्ये लावलेल्या काही रोपांवर मला सावली पाहिजे. या दोन रांगातल्या काही फांद्या एकमेकींना बांधल्या, की झाली खाली सावली. “दोन रांगांमधल्या जागेत झुडपांचं रान माजलं होतं. मी म्हटलं, “हे असं काय ?' ही झुडपं मी तोडणार, याच जमिनीवर ती वाळू देणार, यातच ती मिसळून जाणार. असा गुबगुबीत थर तयार झाला पाहिजे जमिनीवर. आता यातही कितीतरी चांगलीही झाड आलीत बघ. एक भेंडीचं झाड दाखवलं, गवारीचं दाखवलं, भुईमुगाचा छोटा प्लॉट दाखवला. ' आम्ही आम्हाला पाहिजे तेवढी तोडतो, बाकीच्या शेगा तशाच वाळतात. खाली पडतात. भरपूर रोपं येतात. आपलं काम फक्त जी रोपं चांगली आहेत ती ठेवायची, बाकी काढून टाकायची. शेती म्हटलं की क्षितिजापर्यंत पोचलेली एकसारखी कॅलिफोर्निया टाइप शेती हे समीकरण आपल्या डोक्यात बसल आहे. ते लोक हे पाहून चक्रावतात. म्हणतात, 'हे साफसूफ कां करीत नाही ?' आम्हाला तसं नकोच आहे. आम्हाला उलट बायोडायव्हर्सिटी (जैबिक विबिधताच) हवी आहे. या भुईमुगाच्या शेंगा बघा. सगळ्या शेंगा अगदी सारख्याच पुष्ट झाल्यात. ** अनेक छोट्या प्लॉटमध्ये उसाचाही एक प्लॉट होता. तो म्हणाला, “उसासाठी पाचशे स्क्लेअर फूट जागा ठेवलीय. म्हणजे पाचशे झाडं. यातून इतका गूळ किंवा इतकी साखर होऊ शकते. ''रस उकळून गूळ काढणं समजू शकतो, पण साखर ?* अवघड नाही. सेट्रिफ्ययुगल फोर्सनं साखर करणं सोपं आहे आणि नुसत्या उसाचीच नाही तर बीट, शिंदीसारख्या वेगवेगळ्या झाडांपासून ही साखर, खडीसाखर करता येते. ऊसतोडणी कामगारांची मी मागे पाहणी करीत होतो. त्यावरून काही आढवण होऊन विचारलं, ' अरे, ते ऊसतोडणी यंत्र कोणी तयार करत होतं ते झाल का?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now