'विश्व' आपलं कुटुंब | NATURE SCIENCE SOCIETY
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
59
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कृष्ण कुमार - Krishna Kumar
No Information available about कृष्ण कुमार - Krishna Kumar
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
शोभा भागवत - SHOBHA BHAGWAT
No Information available about शोभा भागवत - SHOBHA BHAGWAT
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)वाटते. कधी दोन-तीन मुंग्या मिळून एखादा कण घेऊन जाताना दिसतात.
ह्या मुंग्यांच्या मागेपुढे मिरवणूक निघाल्यासारख्या खूप मुंग्या ओळीने चालत
जात असतात.
तुम्ही किती प्रकारच्या मुंग्या पाहिल्या आहेत?
काळ्या मुंग्या, लाल मुंग्या, विणकाम करणाऱ्या मुंग्या, छढाऊ मुंग्या,
पानं कातरणाऱ्या मुंग्या, काही मुंग्या छोट्या असतात, काही मुंग्या मोठ्या
असतात.
मुंग्यांपेक्षा काही लहान असं तुम्ही पाहिलं आहे का?
नाही? बघा बरं आठवून.
जेव्हा तुम्ही रात्री दिव्याच्या उजेडात पुस्तक वाचता तेव्हा छोटे छोटे
किडे कधी कधी पुस्तकावर पडतात. ते धुळीच्या कणासारखे वाटतात, पण
प्रत्यक्षात ते छोटे कीटकच असतात. काळजीपूर्वक निरखून पाहिलं, तर॒
तुम्हाला त्यांचे चिमुकले पंख आणि पाय दिसतात आणि ते हालचाल करतायत
हेही दिसतं. आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो असे हे सर्वात छोटे कोटक
असतात. नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो असे हे कोटक म्हणजे
असेपण कीटक आहेत का, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत?
कितीतरी! तुम्हा आणखी काही समजून घ्यावं असं वाटतंय का
त्यांच्याबद्दल?
तुम्हाला सगळ्यांना कधी ना कधी सर्दी झाली असणार ! कसला त्रास
होतो नाही, सर्दी झाल्यावर ! सारखं नाक वाहत असतं. वैताग येतो अगदी
सर्दी झाली की !पाण्यात खेळता येत नाही. ती बरी झाल्याशिवाय बाहेर जाणं
नको वाटतं.
. आपल्याला सर्दी कशामुळे होते, तुम्हाला माहीत आहे का?
आपण नाकानं जेव्हा श्वास पेतो तेव्हा त्या श्वासाबरोबर हवेतले काही
'व्हायरस' म्हणजे जीवाणू किंवा जंतू आपल्या नाकांत जातात. त्यामुळे सर्दी
. होते. हे जंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. हे जंतू मुंग्यांपेक्षा
मुंग्यांपेक्षा कितीतरी लहान असतात. साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रानीसुद्धा ते दिसू
शकत नाहीत. त्यासाठी 'इलेक्ट्रॉन' सूक्ष्मदर्शक लागतो
आता दुधाचं दही कसं होतं हे कोणाला सांगता येईल?
सौप्पं आहे नाही का? जेव्हा दूध आंबट होतं, तेव्हा दुधाचं दही होतं.
पण ते दही आंबट कसं होतं? कशामुळे?
आपण पाहू शकत नाही अशा काही छोट्या जंतूंचं ते काम असतं.
त्यांना 'बॅक्टेरिया' असं म्हणतात. हे जंतू आपण फक्त सूक्ष्मदर्शकातूनच पाहू
शकतो.
व्हायरस म्हणजे सूक्ष्म (मायक्रो) जीव. बॅक्टेरिया म्हणजे सुद्धा सूक्ष्म
जीव.
पोळी-भाकरी जर शिळी झाली, तर तिच्यावर किंवा जुन्या खराब
लोणच्यावर असा एक पांढरट-काळसर कापसासारखा थर तयार होतो. तो
तुम्ही पाहिलाय् कधी? त्याला आपण 'बुरशी' म्हणतो. बुरशी म्हणजे सुद्धा
सूक्ष्म जीवच असतात.
आपल्या भोवतालच्या हवेत आणि पाण्यात असे कोट्यवधी जीव
असतात. त्यांच्यातले काही धोकादायक असतात. ते आपल्या शरीरांत
घुसले, तर आपल्याला आजारपण येतं. क्षय, कांजिण्या, आव, मलेरिया,
हत्तीरोग असे ह्या सूक्ष्म व धोकादायक जीवजंतूंपासून होणारे रोग आहेत.
ज्या सूक्ष्म जीवांपासून रोग होतात त्यांना “जंतू” म्हणतात.
असे काही जंतू, आपण पितो त्या पाण्यातून, खातो त्या अन्नातून
आपल्या शरीरांत जातात.
मित्रांनो ! हे सगळेच जीव काही धोकादायक किंवा वाईट असतात
असं समजू नका बरं का. त्यांच्यापैकी काही चांगलेसुद्धा असतात. ते आपल्या
उपयोगी पडतात. आपल्याला दुधाचं दही करणारे सूक्ष्म जीव माहीत
आहेतच. त्याचप्रमाणे काही सुक्ष्म जीवांच्या कामामुळेच फळं पिकतात. काही
सूक्ष्म जीव माती सुपीक करण्याचं काम करतात. काही जीव मेलेल्या प्राण्यांचं
User Reviews
No Reviews | Add Yours...