गर्द | GARD
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
77
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अनिल अवचट - ANIL AWACHAT
No Information available about अनिल अवचट - ANIL AWACHAT
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)खालच्या मजल्यावर आलो.
आनंद म्हणाला, “ माझ्या खमवर थोडा वेळ विश्रांती घेऊ. संध्याकाळी
प्रभाकर नावाचा पेशंट येणार आहे भेटायला. तो रिकव्हर्ड अँडिक्ट आहे.
शुक्रवारची नारकॉटिक अंनॉनिमसची मीटिंग तोच येतो. चांगला बोलका आहे. तू
बोल त्याच्याशी. ' उ
|“ 0 टर टे
के. ई. एम.च्या मुख्य इमारतीकडून दुसऱ्या इमारतीतल्या वॉर्डामध्ये
निघालो होतो. वॉर्डामध्ये पेशंटना भेटायला येणाऱ्यांची संध्याकाळची गर्दी
ओसरत चाललेली होती. बाहेरच्या कठड्यांवर, पॅसेजमध्ये ठेवलेल्या बाकड्यांवर
बसून पेशंट्स् गप्पा मारीत होते. झिजलेल्या फरशा, गुळगुळीत कठडे पाहून सगळं
कसं वर्षानुवर्ष रुळलेलं वाटत होतं.
एकोणीस नंबरच्या वॉर्डात खालच्या मजल्यावर सायकियादी डिपार्टमेंट
आहे. डिपार्टमेंट म्हणजे दोन-तीन खोल्या, त्यात टेबल-खुर्च्या आणि काही
स्टीलची कपाटं. संध्याकाळ असल्यानं तिथं सगळी सामसूम होती. दिवे लावून
दोन खुर्च्यांमधे मी व आनंद बसून गप्पा मारत प्रभाकरची वाट पाहू लागलो.
ठरलेल्या वेळी प्रभाकर आलाच. तो तिशीचा, सावळा, जाडजूड तरुण
होता. चेहरा गोलसर आणि स्मार्ट होता. मिश्यांची बारीक पट्टी होती. अगात
निळ्या आणि लाल रंगांचं भडक कॉम्बिनेशन असलेला टी शर्ट घातलेला होता.
समोरच्या खुर्चीत तो बसला. आमचं चाललं होतं ते बोलणं संपल्यावर आनंदनं
माझी ओळख . करून दिली व म्हणाला, (तुझी पहिल्यापासूनची हकीगत
सांग यांना. ”
मी म्हटलं, ' अगदी बारीकसारीक तपशीलसुद्धा सांगा. मला भरपूर
वेळ आहे. '
प्रभाकर सांगू लागला, 'मी नेव्हल डॉकमध्ये कामाला होतो. आधी
अप्रेंटिस म्हणून, तिथं वरच्या पोस्टला सिलेक्ट झालो. पगार चांगला मिळू लागला.
तिथं आमचा ग्रूप जमला. खूप एंजॉय करायचो. कुणीतरी आम्हाला चरस
इन्ट्रोड्यूस केला. काडीवर चरसची गोळी थापून बसवायची. दुसरी का ५-'वून
ती गरम करायची. तो कडक झाला की तंबाखूत मळून सिगरेटमधनं भाय यो.
कधी चिलमीतनं. मोठी मजा यायची. नंतर कुणीतरी ब्राऊन शुगर भाण. मग
दोन्ही घेऊ लागलो. मुंबईत चरस आणि ब्राऊन शुगरला * राम भर शयाम
म्हणतात.
२६
आनंद म्हणाला, ' तुमच्या पुण्याला चरसला केशर आणि ब्राऊन शुगरला
कस्तुरी म्हणतात. * :. र
मी म्हणालो, * बघा, आहे की नाही आमचं पुणं जास्त सुसंस्कृत. '
सगळे हसलो.
प्रभाकर म्हणाला, पण आम्ही राम और श्याम खरोखरच एंजॉय केलं.
स्टॉक घेऊन आम्ही सगळे दोस्त कर्नाळ्धाच्या अभयारण्यात जायचो. रात्री
शेकोटी करून दम मारायचो. सकाळी दम मारून अरण्यात हिंडायचो. झाडं,
जंगल पाहताना मस्त वाटायचं. वर्ष-दीड वर्ष असं मस्त एंजॉय केलं. पुढं चरस
सुटला आणि ब्राऊन शुगर वाढत गेली. ऑफिसच्या कामावर मी परिणाम होऊ
दिला नव्हता. पण खर्च वाढत चालला. सगळा पगार याच्यातच जायला लागला.
चारी भाऊ मिळवते होते. त्यामुळे मला घरी पैसे द्यावे लागत नव्हते. पण एके
दिवशी माझ्या शर्टात गर्दची रिकामी बाटली सापडली. त्यामुळे घरी कळलं. पण
मी सांगितलं, ' माझा मित्र हे घेतो. त्यानं घेऊ नये म्हणून मी त्याच्या खिशातनं
काढून घेतली ती ही माझ्या खिशात राहिलीय ' असं सांगून वेळ मारून नेली. पण
त्यानंतर माझ्यावर सगळे लक्ष ठेवू लागले. मी कामावर दांड्या मारू लागलो. पुढे
पुढे तर फक्त पगाराच्या दिवशी जाऊन मिळेल तेवढा पगार घेऊन त्याची नशा
करू लागलो. भावांनी मला एकदा खोलीत कोंडून खूप बदडलं. माझे भाऊ म्हणजे
एकेक सॉलिड आहेत. पण संधी मिळाली की मी परत जायचो. '
* गर्द कुठून आणायचा ? *
' भेंडीबाजारमधून. जेव्हा पैसे होते तेव्हा तिथं जाऊन चेसिंग करून
यायचो. तिथं आत एक हॉल आहे. खास गिर््हाइकांना तिथे सोडायचे. आत
वातावरण अगदी पॉश. खाली गालीचे त्यावर अष्टकोनी आकाराची टेबलं होती
त्याला छोटी ड्रॉवर्स होती. त्यांत सिगरेटच्या चांद्या, मॅच बॉक्सेस, मेणबत्त्या
ठेवलेल्या असायच्या. वेटरसारखे तिथले लोक ब्राऊन शुगर “ सर्व्ह ' करायचे. मग
मेणबत्ती पेटवून निवांत चेसिंग करीत बसायचो. नंतर मग पैसे कमी पडू लागले
तसा रस्त्यावर मिळणारा माल घेऊ लागलो. माझं व्यसन सुटावं म्हणून आईनं
उपास केले. मी सगळ्यात धाकटा म्हणून आईनं माझे खूप लाड केले. चारी भाऊ
चांगले मिळवते, घर घेतलं. तिला वाटलं होतं, आता आपले म्हातारपण निवांत
घालवू. पण तेवढ्यात माझं हे व्यसन सुरू झालं. भाऊ, वहिन्या सगळ्यांना त्रास
व्हायला लागला तसं मी घर सोडलं. एका बागेत राहायला लागलो. या व्यसनापायी
इतका बेजार झालो की, ठरवलं शिर्डीला जाऊन साईबाबांसमोर हे व्यसन
सीडायचं
२७
User Reviews
No Reviews | Add Yours...