डॉ० रखमाबाई | DR. RAKHMABAI

Book Image : डॉ० रखमाबाई  - DR. RAKHMABAI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सीमा केतकर - Seema Ketkar

No Information available about सीमा केतकर - Seema Ketkar

Add Infomation AboutSEEMA KETKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
या निकालाच्या विरोधात साहजिकच दादाजी वरच्या कोटीत गेला. त्यावेळी प्रसिद्ध समाजसुधारक काशीनाथ पंत तेलंग यांनी रखमाबाईची बाजू मांडली. रखमाबाईनं विवाहाला कधीच संमती दिली नव्हती व दादाजीला आपला नवरा मानलं नव्हतं असा युक्तीवाद त्यांनी केला. अर्थातच न्यायालयाला हे म्हणणं मान्य झालं नाही. निकाल दादाजीच्या बाजूनं लागला. रखमाबाईने दादाजीबरोबर नांदावयास जावं असा आदेश कोर्डानं १८८७ मध्ये दिला. जर रखमाबाईनं हा आदेश मोडला तर तिला सहा महिन्याची शिक्षा भोगावी लागेल असं सांगितलं. तसेच खालच्या कोर्टाचा खर्च. रखमाबाईने द्यावा व नंतंरचा खर्च दोघांनी वाटून घ्यावा असेही फर्मान कोर्टानं काढलं. या निकालामुळं आधी उठलेलं वादळ निवलं. सनातन्यांचा विजय झाला होता. धर्मावरंच संकट टळलं, असंच त्यांना वाटलं. स्त्रियांवरचे संकट कायम राहिल्याविषयी त्यांना देणं--' घेणं नव्हतं. स्त्रीची पुढं पडणारी पाऊलं पुन्हा एकदा जखडून टाकणारा हा निकाल होता. पण रखमाबाई डगमगली नाही. अजाणत्या वय्लग्नामुळं झालेलं नुकसान भरून काढण्याची तिची तयारी होती. त्यासाठी शिक्षा भोगायला ती तयार होती. तसा निरोपही तिनं कोर्टाला पाठवला होता. या खटल्याच्या सुमारासच तिचे वडील वारले. तरीदेखील तिच्या आईने व आजोबांनी तिला मदत केली व धीर दिला. ८ “डॉ. रस्वमाबाई त्याकाळी सर्वात वरचं कोर्ट (प्रिव्ही कौन्सिल) हे इंग्लंडला भरत असे. तिथं जायचं तर पैशाचा प्रश्‍न होता. न्यायासाठी लढणाऱ्या रखमाबाईबद्दल सहानुभूती वाटणाऱ्या काही इंग्रजांनी रखमाबाई बचाव समिती” स्थापन केली. तिला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. खटल्यातून सुटण्याचा आणखी एक मार्ग तिच्यासमोर होता. तो म्हणजे धर्म बदलण्याचा. खिश्चन धर्म स्वीकारण्याचा. परंतु रखमाबाईने ती वाट धरली नाही. हिंदू राहूनच हक्कांसाठी लढणं त्यांना आवश्यक वाटत होतं. इंग्लंडला संसदेतही या प्रश्‍नावर आवाज उठला. तिथंही रखमाबाईला सहानुभूती मिळाली. इंग्लंडमधून अनेक स्त्रियांनी वर्तमानपत्रात पत्रं लिहीली. सर्वोच्च न्यायालयात जायचं म्हणजे खूप खर्च येणार. दादाजीलाही इतका खर्च परवडणारा नव्हता, आणि रखमाबाईलाही ते अशक्य होतं. या खटल्यामध्ये तडजोड झाली. रखमाबाईनं दादाजीला दोन हजार रूपये द्यावेत व रखमाबाईनं नांदायला यावं हा आग्रह दादाजीने सोडून द्यावा असं ठरलं. जुलै १८८८ साली या प्रकरणावर पडदा पडला. या प्रकरणात कोर्टामध्ये नवऱ्याच्या मामाचे चारित्र्य चांगले नाही असे' रखमाबाईने निवेदन केलं होतं, म्हणून रखमाबाई व तिच्या आजोबाविरूद्ध दादाजीने अब्रूनुकसानीचा दावा लावला. पण त्यातून ती _ सहीसलामतबाहेर सुटली. दादाजीने तिच्यावर इतरही आरोप केले होते. जयंतीबाईने दुसरे लग्न केल्यामुळे रखमाबाईला तिच्या वडिलांची २५ हजार रुपयांची मालमत्ता मिळाली डॉ. रखमाबाई/९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now