फुग्याचा तो दिवस | THE DAY OF THE BUBBLE

THE DAY OF THE BUBBLE by जेम्स ए० स्मिथ - JAMES A. SMITHपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जेम्स ए० स्मिथ - JAMES A. SMITH

No Information available about जेम्स ए० स्मिथ - JAMES A. SMITH

Add Infomation AboutJAMES A. SMITH

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्याच्या कानावर हेन्टमामाचे शब्द मात्र येत होते, 'होमर तू बघच. एक दिवस चांगला अडचणीत सापडशील या फुग्यांमुळे .. हे काही स्वाभाविक नाही... !' आता होमरला काही ऐकू येत नव्हतं. फुगा इतका मोठा झाला होता की तो जमिनीला टेकला होता. होमर फुगा जमिनीवर घासून फुटू नये म्हणून प्रयत्न करत होता. पण तरीसुद्धा होमर एकीकडे जोरजोरात फुंकर मारत होताच. त्यामुळे अर्थातच फुगा मोठ्ठा, आणखीन मोठ्ठा होत होता. होमर अगदी सावकाश व्हरांड्याच्या कडेला येऊन उभा राहिला. त्यामुळे फुग्याला लटकायला जागा मिळाली. दहा फूट, अकरा फूट, बारा फूट.. .फुगा आणखी फुगत होता. तेरा फूट, चौदा फूट... आणि होमरच्या कानावर हेन्यीमामाचे शब्द फुम्याचा तो दिवस (६) आले 'बापरे !* आणि तेवढ्यात एक जोरदार धमाका झाला आणि त्याबरोबर तो फुगा फुंकायच्या नळीपासून सुटला. थोडा वेळ फुगा थरथरला, हलला पण फुटला नाही. फुटायच्या ऐवजी फुगा गोलगोल चाकासारखा फिरायला लागला. पहिल्यांदा हळूहळू फिरत होता. पण टेकडीच्या उतारामुळे त्याचा वेग वाढला. आत्तापर्यंत हेन्येमामा उठून उभा राह्यला होता आणि म्हणत होता, 'होमर मी तुला आधीच सांगितलं होतं, एक ना एक दिवस...!' पण आता होमरला काहीही ऐकू येत नव्हतं. तो टेकडीवरून खाली जाणाऱ्या आपल्या भल्यामोठ्या फुग्याच्यामागे पळत होता. तिकडे टेकडीवर काळी गाय गवत खात होती. तिला फुगा आपल्याकडे येतोय दिसल्यावर ती जोरात हंबरली हम्मा...! पण तेवढ्यात फुगा तिला जाऊन धडकला. फुगा इतका चिकट होता की काळी गाय त्यात लपेटली गेली. फुग्याचा तो दिवस (७ )
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now