वैज्ञानिक शोध्यांच्या गंमती | VAIGYANIK SHODHANCHI GANMATI

VAIGYANIK SHODHANCHI GANMATI by चित्रा बेडेकर - CHITRA BEDEKARपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

चित्रा बेडेकर - CHITRA BEDEKAR

No Information available about चित्रा बेडेकर - CHITRA BEDEKAR

Add Infomation AboutCHITRA BEDEKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निघाल्यामुळे तो लाकडाचा तुकडा तसाच त्याच्या हातात राहिला. त्याच्यावरचे रासायनिक मिश्रण तसेच राहिले. लक्षात आल्यावर त्याने पाहिले तर काय? त्यावरचं मिश्रण वाळून घट्ट झालं होतं. आता काही उपयोग नाही असं त्याला वाटलं, त्यानं तो लाकडाचा तुकडा टूर भिरकावून दिला. लाकूड दूरच्या दगडावर जाऊन आदळतायच तडतड आवाज होऊन ठिणगी उडाली आणि ते लाकूड जळायला लागलं. जॉनवॉकर अवाक्‌ होऊन बघतच राहिला. बराच वेळ विचार केल्यावर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आग निर्माण करण्याची सोपी पद्धत त्याला सापडली होती. अगदी अचानक! पुन्हा पुन्हा त्याने तो प्रयोग करून पाहिला. नंतर त्याने लाकडाच्या बारीक कांड्या करून त्यांच्या एका टोकावर ते मिश्रण चोपडून वाळवलं. दगडाऐवजी वाळूच्या कागदावर (सॅन्डपेपर) या काड्या घासल्या की ठिणगी पडून काडी पेटत असे. त्यानंतर स्वीडनच्या एका शासज्ञाने जॉनवॉकरच्या आग- काडीत थोडी सुधारणा करून सुरक्षित आगकाड्या* बनवल्या. या आगकाड्या ज्या पेटीत असतात त्याच्या दोन. बाजूंना एक रासायनिक मिश्रण लावलेलं असतं. पेटीत ठेवलेल्या आगकाड्या या बाजूंवर घासल्या तरच त्या पेट घेतात. एरवी त्या सुरक्षित असतात. आज आपण अशाच काड्यापेट्या वापरतो. मककन लाथ मारीन तिथे .. टकळी, पेळू, चरखा आणि सूतकताई या गोष्टी आपल्या ऐकण्यात आलेल्या. आहेत. चरखा म्हटला म्हणजे सूतकताई करणारे गांधीजी नजरेसमोर येतात. सूतकताई आणि चरखा ही भारतातल्या स्वदेशी चळवळीची प्रतीकं होती. पण अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये या सूतकताईवरच काही कुटुंबांचा उदर- निर्वाह अवलंबून असायचा. हारग्रीब्जचं कुटुंब अशांपैकीच होतं. १७४५ मध्ये हारग्रीब्जचा जन्म झाला. त्यावेळी त्याचे आई- वडीलसुद्धा सूत कातण्याचा आणि कापड विणण्याचा वंशपॅरॅ- -- परेचा धंदा. करत होते. अर्थातच मोठेपणी हारग्रीब्जच्या नशिबी तोच धंदा आला. हारग्रीब्ज आणि त्याची बायको कातलेले सूत जवळच्याच एका. कापड गिरणीला पुरवत असत. गिरणीच्या मागणीइतके सूत ठराविक दिवशी तिथे नेऊन दिलं तरच त्यांना पुढचं काम मिळत असे. एकदा काय झालं? वायदा केल्याप्रमाणे कापडगिरणीत सूत नेऊन देण्याचा दिवस उजाडला. हारग्रीब्जने आणि त्याच्या बायकोने कातून ठेवलेलं जितकं सूत घरात होतं तेवढं सर्व जमा केलं, पण ते कमी भरलं. त्यामुळे हारग्रीब्जने आपला राग चर- ख्यावर काढला. त्याने रागाच्या भरात चरख्याला जोरात लाथ हाणली. त्यामुळे चरखा खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन आद- ळला. चरखा कलंडून पडला. पण त्याचं चाक मात्र फिरत राहिलं. आणि त्यामुळे आपोआप सूत कातलं जात होतं. ते पाहून ४
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now