पुस्तक विश्व | BOOKS THAT CAN CHANGE THE WORLD

Book Image : पुस्तक विश्व  - BOOKS THAT CAN CHANGE THE WORLD

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रभाकर नानावटी - PRABHAKAR NANAWATI

No Information available about प्रभाकर नानावटी - PRABHAKAR NANAWATI

Add Infomation AboutPRABHAKAR NANAWATI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बुध्दीचा वापर केल्यास तिच्या सर्व समस्यांना उत्तर मिळेल, असे प्रतिपादन केले आहे. स्त्रीने स्वत:ची अबला, फुलासारखी कोमल, भित्री, भावनावश, आधार शोधणारी, या प्रतिमा कोशातून बाहेर पडून शरीराने व मनाने कणखर व्हायला हदवे. स्त्री मुक्त व्हायला हवी. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी स्त्रियांची कुचंबणा होत असते. पुरुष तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेला असतो. बालपणापासूनच सौंदर्य, नट्टापट्टा, इत्यादीवरच भर देत आल्यामुळे स्वत:च्या शरीराकडे पुरुषी नजरेनेच ती पाहत असते. ही सवय मोडली पाहिजे. स्त्री एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकून पडलेली आहे. तिने या तुरुंगातून बाहेर पडायला हवे. सूडाने पेटल्यासारखे पुरुषी व्यवस्था स्त्रियावर अन्याय, अत्याचार करत आली आहे. तिचा प्रतिकार करायला हवा. लेखिकेच्या या पुस्तकात स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानलेल्या प्रेम, वासना, विवाह, लैंगिक संबंध, मालमत्ता इत्यादी गोष्टींचा ऊहापोह केला आहे. स्त्रीने धरसोडवृत्ती सोडून स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करावे असा तिचा आग्रह होता. अजूनही तिने केलेल्या विधानांबद्दल चर्चा चालू आहे. मुस्लिम देशातील स्त्रियांच्या स्थितीवर लेखिकेची त्या काळी केलेली सर्व विधानं आजही तंतोतंत लागू होतात. गेल्या पन्नास वर्षातील स्त्रीमुक्तीबद्दलचा आढावा घेतल्यास मेरी वोलस्टोनक्रॅफ्टचे लेखन, तिचे आयुष्य, तिचे अनुभव तिने उभा केलेला लढा स्त्रीमुक्ती चळवळीला आदर्शवत वाटू लागतील. 1759साली जन्मलेल्या मेरीचे बालपण फार कठिण परिस्थितीतून गेले होते. बापाचा रागीट स्वभाव व त्याचे तिच्या आईशी होत असलेले रोजचे भांडण व मारझोड यामुळे अनेक वेळा मेरीला घराबाहेर थंडीत कुडकुडत झोपावे लागत असे. गंमत म्हणजे तिच्या आईला त्या मारझोडीचे काहीही वाटत नसे. बळीच्या पशूसारखे ती सर्व सहन करी. त्याकाळातील जनरीतीप्रमाणे मेरीचे शिक्षणसुध्दा अर्धवटच झाले होते. भरतकाम, शिवणकाम शिकण्यातच तिचे बालपण संपले. मुळातच ती एक मध्यमवर्गातली स्त्री होती. म्हणूनच तिच्या पुस्तकाचा सर्व रोख पूर्णपणे मध्यमवर्गाकडेच होता. वाचनातील गोडी व भाषणं ऐकण्याच्या छंदामुळे तिच्या ज्ञानात भर पडत होती. आपण आर्थिकरित्या स्वावलंबी व्हावे हे तिचे स्वप्न होते. परंतु स्त्रियांना नोकरीचे दरवाजे बंद होते. फार फार तर एखाद्या श्रीमंत बाईची पगारी सहचरी म्हणून काम मिळण्याची शक्‍यता होती. मेरी एके ठिकाणी सहचरीची नोकरी पत्करून फावल्या वेळात ती लिहू लागली. 1787 मध्ये थॉट्य ऑन दि एज्युकेश्वन ऑफ डॉटर्स हे तिचे पुस्तक प्रसिध्द झाले. पुस्तकाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याच काळात एड्ंड बर्क व रिचर्ड प्राइस या उदारमतवाद्यांच्या संपर्कात आल्यामुळे ती स्वत:च्या व स्त्रियांच्या संबधी विचार करू लागली. फ्रेंच ब्रंतीमुळे स्वातंत्र्य व समता परवलीचे शब्द झाले होते. उदारमतवाद्यांना जग बदलण्याची आकांक्षा होती. थॉमस पेन व रूसो या तत्त्वज्ञांचे लेखन वाचताना ती भारावून जात होती. 16




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now