दहा चिमुकली बोटे | TEN LITTLE FINGERS
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
5 MB
                  Total Pages : 
127
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :
अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA
No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA
उल्हास टुमने - ULHAS TUMNE
No Information available about उल्हास टुमने - ULHAS TUMNE
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो
। विज्ञानाचा इतिहास हैही एक विज्ञानच आहे. प्रत्येक पिढी आपापल्या परीने आधीच्या ज्ञानात भर टाकत असते. आपल्याला आज जे काही
माहीत आहे त्याचे कारण आपण मागच्या अनेक पिढ्यांच्या उत्तुंग खांद्यांवर उभे आहोत हे आहे. आजच्या शाळकरी मुलाला 400 वर्षांपूर्वी
होऊन गेलेल्या न्यूटनपेक्षा जास्त गणित येते.
इ.स. 1910च्या सुमारास भारतात रास. ई. स्टोक्स नावाचा एक अमेरिकन गृहस्थ आला होता. त्याने हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या
। लागवडीची व त्याच्या प्रसाराची मुहुर्तमेढ रोवली. परोपकारी वृत्तीच्या त्या माणसाने कोटगढ येथे लहान मुलांसाठी एक शाळाही चालू केली
रिचर्ड ग्रेग्ज नावाचा एक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, गांधीजींच्याकडून प्रेरणा घेऊन, 1920च्या सुमारास भारतात काम करण्यासाठी आला
कोटगंढच्या ह्या स्टोक्ससाहेबांच्या शाळेत ह्या ग्रेग्ज साहेबाने सुमारे दोन वर्षे लहान मुलांना कृतिशील विज्ञानाचे धडे दिले. भारतीय मुलांबरोबर
काम करताना त्यांना आलेल्या खऱ्याखुऱ्या अनुभवावर आधारित श्प्रिपरेशन फॉर सायन्स' या नावाचे एक पुस्तक त्यांनी 1928च्या सुमारास
लिहिले. हे पुस्तक अहमदाबादच्या नवजीवन प्रकाशनाने प्रथम छापले. भारतीय शांळांतील मुलांना विज्ञान कसे शिकवावे ह्यावरचा आजही तो
एक मूलभूत ग्रंथ मानला जातो.
। ग्रेग्जसाहेब लिहितात,
“ह्यासाठी लागणारी उपकरणे ही अतिशय सामान्य आणि बिनखर्चिक असतात, आणि खेड्यांतील मुलांना त्यांतील जवळजवळ सर्वाचा
। परिचय असतो. त्यातील बरीचशी उपकरणे, खेड्यातील सुतार, कुंभार किंवा लोहायंकडून बनवून घेता येतात. यंत्रे किंवा न समजणारे तंत्रज्ञान
म्हणजे विज्ञान असा मुलांना समज होता कामा नये. विज्ञानाच्या थोर उद्गात्यांनी आपले काम अतिशय सामान्य उपकरणे वापरून कैले आहे.
त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, अतिशय खर्चिक आणि अद्ययावत उपकरणांशिवाय, शास्त्रीय विचार करायला शिकणे हे आपल्याला
शक्य आहे. खरंतर विद्यार्थ्याचे मन हेच यातील सर्वात मूल्यवान उपकरण आहे.”
ग्रेग्जसाहेब पुढे लिहितात, “अशी माझी मुळीच इच्छा नाही की, भारतीय मुलांच्या मनात कुठेतरी असा समज असावा की विज्ञान ह्य केवळ
एक शालेय विषय आहे आणि तो केवळ कांस्य आणि पितळेच्या चकचकीत उपकरणे आणि साहित्य यातूनच शिकता येतो. माझा असा पूर्ण
विश्वास आहे की पाश्चिमात्य देशातील प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जागऱ्या महाग उपकरणांचा वापर केल्याशिवाय किंवा त्याचा अगदी
कमीतकमी वापर करून सुद्धा भारतीय मुले अधिक सुस्पष्ट आणि शास्त्रीय विचारपद्धती विकसित करू शकतात.”
जसे विज्ञानाच्या इतिहासात यापूर्वीही अनेकदा घडले आहे, त्याप्रमाणे ह्या महत्त्वपूर्ण आणि पथदर्शक पुस्तकाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
1975 मध्ये ह्या पुस्तकाला एक उद्धारकर्ता मिळाला. युनिसेफचा एक सल्लागार किथ वॉरेन याने या पुस्तकाचा काही भाग चित्रांसकट
छापला. या पुस्तकाचे नाव होते 'प्रिपरेशन फॉर अंडरस्टँंडींग' (समजूत घेण्याची तयारी) ह्या पुस्तकाचे हिंदी भाषांतर नॅशनल बुक ट्रस्ट,
इंडियाने प्रकाशित केले आहे.
यापुढील काही पानांत दिलेल्या कृती वरील पुस्तकातून घेतल्या आहेत. लहान मुले साध्या सरळ गोष्टीतून अधिक चांगल्या रीतीने शिकतात
विशेषतः त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या आणि त्यांच्या आसपास सहजतेने मिळणाऱया वस्तूंबद्दल माहिती करून घेणे, त्यांना
साहजिकच अधिक लाभदायी हीते
ह्या गोष्टी दोन-तीन मुलांनी मिळून एकत्रितपणे करणे हे अधिक चांगले. त्यामुळे मुले एकमेकांना मदत करायलाही शिकतात आणि उपलब्ध
वस्तूंचा मिळून वापर करायलाही शिकतात. मुलांमध्ये त्यामुळे सहकार्याची भावना निर्माण होते. जिज्ञासा, प्रयोग, विश्लेषण व शेवटी शोधाची
अभिव्यक्ती हाच विज्ञानाचा आधार आहे. निरनिराळ्या वस्तू, क्रिया आणि विचार यांच्या निरनिराळ्या जडणघडणीतून नवीन क्रम, रचना व
नमुने निर्माण करणे हे ह्या प्रक्रियेचे प्रमुख अंग आहे. नवीन रचना ब निर्मिती हेच विज्ञान आहे. मुलांनी आपले हात, इंद्रीये व मेंदूच्या
साहाय्याने आपल्या आसपासच्या जागेतील वेगवेगळ्या रचना व नमुने शोधावेत हाच या कृतिविधींचा उद्देश आहे.
नियमबद्धतेचा शोध म्हणजेच आकलन होय.
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...