अमीर खुसरो | AMIR KHUSRO

AMIR KHUSRO by पुस्तक समूह - Pustak Samuhसैयद गुलाम सम्मानी - SYED GHULAM SAMMANI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सैयद गुलाम सम्मानी - SYED GHULAM SAMMANI

No Information available about सैयद गुलाम सम्मानी - SYED GHULAM SAMMANI

Add Infomation AboutSYED GHULAM SAMMANI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
26 अमीर खुसरो सांभाळीत होता व बादशहा लखनौतीला गेलेला होता. तो अजून दिल्लीला परतला नव्हता. याच कालावधीत हजरत निजामुद्दीन यांना मृत्यू आला व त्यांच्या प्रेतयात्रेत शाहजाद्याने स्वतः खांदा दिला. ही वार्ता बादशहाला कळाली तेव्हा तो फारच नाराज झाला.”* या सर्व कारणांमुळेच परंपरेने चालत आलेल्या पुढील कथेला बळकटी येते : लखनौतीहून दिल्लीला येण्यासाठी बादशहा निघाला तेव्हा त्याने हजरत निजामुद्दीन अवलिया यांना निरोप पाठविला, की तो दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच त्यांनी दिल्ली सोडून निघून जावे. एक तर दिल्लीत हजरत निजामुद्दीन राहतील किंवा मी राहीन. ह्य आदेश मिळाल्यावर हजरत निजामुद्दीन अवलिया यांनी जे ऐतिहासिक उद्गार काढले ते अजूनही एखाद्या म्हणीप्रमाणे सर्वत्र वापरले जातात. ते म्हणाले, 'हनूज दिल्ली द्र अस्त” दिल्ली तर अजून दूर आहे.1 आणि झालेही तसेच. बादशहा दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वीच त्याच्या स्वागतार्थ बांधण्यात आलेला भव्य दरवाजा अंगावर कोसळून मरण पावला. ही घटना इ. स. 1325 मधील होय. याच वर्षी हजरत निजामुद्दीन अवलिया यांनाही मृत्यू आला. खुस्रो यावेळी दिल्लीत नव्हते. सुलतान गियासुद्दीन तुगलकबरोबर तेही लखनौतीहून परतत होते. त्यांना बहुधा वाटेतच ही वार्ता कळाली असावी. दिल्लीला आल्यावर ते हजरत निजामुद्दीन अवलिया यांच्या कबरीजवळ गेले. असेही सांगितले जाते की कबरीकडे जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मस्तकावरील केस कापून टाकले आणि तोंडाला काळे फासून घेतले. कबरीजवळ जाताच उद्गारले *सुब्हान अल्ला! काय आश्चर्य आहे! सूर्य धरणीच्या पोटात दडावा आणि खुस्रोने जिवंत राहावे!” आणि मग पुढील हिंदी दोहा उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडला. “गोरी सोवे सेज पर और युखपर डारे केरा चल खुलली षर॒ अपने रैन थर्ड चौदेस” (गोरी शेजेवर झोपली आहे. तिचै केस मुखावर आलेले आहेत. खुसरो, आता आपल्या घरी चल. रात्र चारी दिशांना पसरली आहे.) हा दोह्य म्हणताच ते बेशुद्ध झाले. श्रुद्धीवर येताच म्हणाले, “यानंतर जगण्याचा व जीवनाचा उपभोग घेण्याचा मला अधिकार नाही.” त्यानंतर त्यांनी आपले सर्व सामान, सर्व चीजवस्तू आपले गुरू निजामुद्दीन अवलियाच्या नावाने दान करून टाकले. यानंतर केवळ सहा महिन्यांतच बुधवार, दि. 18 शवाल 725 हिजरी, (इ. स. 1327) रोजी ते परमात्म्यास जाऊन मिळाले. त्यांच्या इच्छेनुसार आपल्या गुरूच्या चरणांशीच त्यांना दफन करण्यात आहे.11- “मुमताज हुसेन : अमीर खुसरो देहलवी या ग्रंथात इब्न बतूतांच्या प्रवासवर्णनातून घेतलेला उतारा. 1 अब्दुल कादर बहायूजी : मुन्तकब-उल-तएवारीख 11 डॉ. वहीद मिर्जा : अमीर ख्ुसो--चरित्र आणि कर्तृत्व अमीर खुसरो 217 अशा रीतीने अनेक घडामोडींनी भरलेले एक जीवन आपल्या शेवटच्या मुक्कामाला पोहोचले. खुस्रोने अनेक स्थित्यंतरे बघितली, अनेक चढ-उतार अनुभवले. गुलाम वंशाच्या राजवटीपासून ते खिलजी वंशापर्यंत अनेक राजवंशाचे उत्कर्ष आणि अपकर्ष त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. मंगोलियाच्या जुलमी हाताच्या तावडीत ते सापडले. अनेक बादशहा आणि शाह्जाद्यांची स्तुतिस्त्रोत्रे त्यांनी गायली. आपल्या काव्यगुणांचे व कलात्मकतेचे उच्चतम शिंखर त्यांनी गाठले आणि शेवटी आपले आध्यात्मिक गुरू, स्वामी हजरत सुलतान कल्‌-मशायखाँ महबूबे इलाही निजामुद्दीन अवलिया यांचे ते निष्ठावान व आज्ञाधारक सेवक बनले. सारांश अमीर खुस्रोसारखी माणसे क्वचित जन्माला येतात आणि जेव्हा तेव्हा चिरंजीवित्व घेऊन येतात व भविष्यावर आपल्या श्रेष्ठ कर्तृत्वाचे न मिटणारे ठसे उमटवून जातात. अमीर खुस्रो सर्व कालांचे आहेत आणि जवळच्या वा दूरच्या सर्व लोकांकडून आपल्या मृत्यूनंतरही कृतज्ञतेची खंडणी वसूल करीत आहेत. इक्बालने म्हटले आहे “ऐबक आणि घोरी यांनी केलेली युद्धे नामशेष झाली. परंतु खुस्रोचे गीत मात्र अजूनही ताजे आणि मधुर आहे.”* डॉ. वहीद मिर्जा यांनी आपल्या “अमीर खुस्रो-चरित्र आणि कर्तृत्व” या इंग्रजी ग्रंथांत म्हटल्याप्रमाणे बाबरच्या काळापासून खुस्रोच्या कबरीवर कसलीही पक्की इमारत बांधण्यात आलेली नाही. भोवतालच्या चार भिंती आणि कबरीवरील नामशिला, बाबरच्याच काळातील एक अमीर मेहदी ख्वाजा यांच्या निगराणीत तयार झाल्या आहेत. नामशिलेवर त्याच काळातील एक कवी शहाब मुअम्माई याचे एक पद्य लेखांकित केलेले असून, त्यात खुस्रोच्या मृत्यूचा दिनांक नोंदलेला आहे. * डॉ. वहीद मिर्जा : अगीर ब्रुसी--चरित्रि आणि कर्तृत्व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now