आमच्या नदयांची कहाणी - भाग 2 | AMCH NADIYANCHI KAHANI - PART 2

AMCH NADIYANCHI KAHANI -  PART 2 by अलू वलीअप्पा - ALU VALIAPPAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अलू वलीअप्पा - ALU VALIAPPA

No Information available about अलू वलीअप्पा - ALU VALIAPPA

Add Infomation AboutALU VALIAPPA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
म्हणून तिचे नाकच कापून टाकले. आपला पिता राजा दक्षरथ याच्या मृत्यूचे वृत्त कळल्यावर राम-लक्ष्मणाने इथेच स्नान केले होते, असे मानले जाते. हिंदंमध्ये जवळचा आप्त मरण पावल्यावर स्नान करून शुचिर्भत होण्याची प्रथा आहे. महात्मा गांधी इंग्लंडहून आल्यावर आपल्या मातेच्या निधनाची बातमी त्यांना समजली तेव्हा नासिकच्या गोदावरीतच त्यांनीही स्नान केले होते. कावेरीप्रमाणेच गोदावरीलाही वाहात जाताना अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यातली पहिली नदी प्राणहिता. ती महाराष्ट्रात उगम पावते. पुढे गोदावरीला इच्द्रावती आणि शबरी (रामकथेशी संबंध असलेले आणखी एक ताव) या नद्या येऊन मिळतात. अशा अनेक लहानमोठ्या नद्या मिळाल्यामुळे गोदावरीची संदी चार किलोमीटर्स होते. मात्र तिची रुंदी सर्वत्र सारखीच आहे असे नाही. पूर्वे घाटाकडे वाहात जाताना काही ठिकाणी ती असंद आहे, तिच्यात तिथे पाणीही कमी असते. पण गोदावरी राजमहेग्द्रीला (पूर्वीचे रांजमहेन्द्रवरम्‌) पोचल्यावर तिचे पात्र दृष्टी ठरत नाही इतके विद्याल बनते. राजमहेन्द्रीला गोदावरीवर असणारा रेल्वे पूल त्याची कल्पना देतो. भारतातला हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पूल असून त्याला 56 कमानी आहेत. राजमहेच्द्री शहराला थोर परम्परा आणि इतिहास आहे. मोठमोठ्या राजघराण्यांचा उदय आणि अस्त त्याने पाहिला आहे. दर बारा वर्षांनी तिथे' होणाऱ्या पुष्करम्‌ उत्सवास प्रयागचा कुंभमेळा व कुंभकोणमचा महामखम यांच्याइतकीच यात्रेकरूंची प्रचंड गर्दी जमते. इथे गोदावरीच्या तीरी माकण्डेय आणि कोटिलिंगेश्‍वर यांची कुठेही सहसा न आढळणारी देवळे आहेत. यात्रेकरूंना ते खास आकर्षण असते. नामवंत कवी, निबंधकार, कादंबरीकार आणि नाटककार यांची . राजमहेन्धी ही जन्मभूमी. अकराव्या शतकात होऊन 30 गेलेला विख्यात अभिजात कवी नान्नया आणि आद्ुनिक तेलूग गद्याचा जनक वीरेशालिगम पंतुलू या दोघांचाही जन्म इथेच झाला व ते इथेच राहिले. साहित्यिक चळवळींचे ते आजही महत्त्वाचे केन्द्र आहे. राजमहेग्द्धीला पोचण्यापूर्वी आपल्याला रामाशी संबंध आलेले गोदा- काठचे आणखी एक गाव लागते. त्याचे नाव भद्राचलम. गोदावरीच्या संस्कृतीचे या सर्वांगसमृद्ध गावात प्रतिबिब पडले आहे, अभे म्हणता येईल. इथे टेकडी- वर उभे असलेले रामाचे मंदिर सर्वांत जुने राममंदिर मातले जाते. रावणाने सीतेला जिथून पळवले असे म्हणतात ते पर्णशाला हे ठिकाण भद्राचलमहून 30 किलोमीटर्सवर आहे. इथेच राम-लक्ष्मणाने लंकेला जाण्यासाठी गोदावरी ओलांडली. रामदास या थोर रामभकताचे गाव म्हणून भद्राचलम अधिक प्रसिद्ध आहे. कबीर आणि मीराबाई इतकीच या रामदासाची भजने देशभर प्रसिद्ध आहेत. रामदासाची गोष्ट खरी गोष्ट आहे. रामदास ही ऐतिहासिक व्यक्‍ती आहे-नुसती दंतकथा नव्हे. त्याचे खरे ताव रामदास नसून गोपण्णा होते आणि तो तहसिलदार होता.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now