आई वडिलांना | AAI VADEEL

AAI VADEEL  by गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKA

No Information available about गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKA

Add Infomation AboutGIJUBHAI BADHEKA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ठेवले तरी तो कधी घरामध्ये येण्याची गोष्ट करणार नाही. फुले ही मुलाचे जिवलग मित्र आहेत. फुलांना पाहून मूल वेड्यासारखे बनते. फुलांना दुरूनच पाहून त्यांचे नाक आपले काम सुरू करते. त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक येते. त्यांच्या दातांच्या कळ्या खुलतात. त्यांच्या गालावर दोन छोट्या खळ्या पडतात मूल फुलावर असे लुब्ध होते की ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर लुब्ध होते. पहिल्यांदा मुलाला निसर्गाची गोडी समजते आणि नंतर त्याला आमची गोडी समजते खाली धुळीत झोपून जेव्हा मूल वर आकाशाकडे पाहते तेव्हा ते काय करते? तेव्हा ते साऱ्या निसर्गाला पीत असते. ते सगळ्या जगावर प्रभाव पाडते चंद्र हा मुलाला रोज नवा आनंद देतो चंद्र रात्रीच दिसतो म्हणून मूल बरोबर विचार करते की दिवसा चंद्र कोठे लपत असेल? कदाचित लपालपीचा खेळ मुलांनी चंद्रापासून शिकला असावा. तुपाने भिजलेल्या भाकरीचा अर्थ आपण आवडीनुसार लावतो. हे काम कला साहित्य जाणकारांचे आहे. आपण रडणांऱ्या मुलाला शांत करण्यासाठी तूप रोटीचा खेळ खेळलो तरी मुलाला वाटते की त्याला चंद्राची चांदणी खाऊ घातली जात आहे चंद्रप्रकाश आणि त्याची शीतलता कोणाला चांगली वाटणार नाही? मुलाचा आनंद तर चंद्राचा रंग पाहण्यामध्ये आहे. चंद्रप्रकाशात न्हाण्यात आहे. चंद्रप्रकाश उरापल्या डोळ्यात साठवण्यात आहे. चंद्रावर एक हरिण आणि एक म्हातारी बसली आहे ही गोष्ट मूल लगेच मान्य करते. हा मुलाचा भोळेपणा नाही. हा तर त्याचा वेडेपणा आहे. निसर्गाबरोबर मुलाचा असाच लळा लागलेला असतो. मुलाच्या बुद्धीला विज्ञानाचा कर्कश पणा चांगला वाटत नाही. याच कारणाने मुलाला पऱ्यांच्या गोष्टी आवडतात अद्‌भुतपणा हा मुलाचा स्वभाव आहे आणि याच अद्‌भुतपणामध्ये त्याचा आनंद समाविष्ट झाला आहे परंतु मुलाबरोबर चंद्राच्या चांदण्यामध्ये फिरायला आम्हाला वेळ कोठे आहे? काय आम्हाला चांदणीवर कविता लिहायची आहे? आम्हाला हरिण मुलाचे घरामधील स्थान कोणते ? 4 आई - वडिलांना / २८ आणि म्हातारी या लोककथेच्या मुळाचा शोध घ्यायचा आहे का? चंद्रावर जिवंत प्राणी राहतात की नाही, याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे की नाही? परंतु या सर्व कामासाठी आज मोकळा वेळ कोणाजवळ आहे? मनुष्य खरा कवी कसा बनेल? मनुष्याला चित्रकलेतील चमत्काराचे दर्शन कसे होईल? निसर्गाला जाणल्याशिवाय मनुष्य निसर्गाला कसा चित्रित करेल? तो त्याचे गाणे कसे म्हणेल? तो त्याच्यावर कविता कशा लिहील? जेवणाशिवाय पोट कधी भरेल का? आपल्या मुलाला निसर्गापासून दूर ठेऊन आपण त्याला काय बनवणार आहात? देव की दानव? आता मी पुन्हा तोच प्रश्न विचारतो, घरामध्ये मुलाचे स्थान काय आहे ? उ आपल्यासाठी भाड्याचे घर पसंत करताना आपण मुलांसाठी कोणती जागा आहे की नाही? याचा विचार करत नाही. पण आपण घर मालकाला हे मात्र निश्‍चित विचारतो की घरात मोरी आहे की नाही? स्वयंपाक घरात उजेड येतो की नाही? झोपण्याच्या खोलीत हवा येते की नाही? स्नानाकरिता नळ आणि मलमूत्र विसर्जनासाठी संडास आहे की नाही? गाद्या आणि उशांना ऊन देण्यासाठी वर गच्ची आहे कौ नाही? परंतु अजून पर्यंत घरामध्ये जाऊन मुलांच्यासाठी खेळण्याकरिता जागा आहे की नाही हे कोणीही विचारलेले नाही. भाड्याने घर घेताना आपणाला _ आपली मुले आठवतील कशी? मुलांच्यासाठी वेगळ्या जागेची गरजच काय? आम्हाला हा विचारच नवीन आणि वेगळा वाटतो. मुलांऐवजी छोट्या-छोट्या प्राण्यांकरिता आजपासूनच वेगळ्या हक्काचा विचार कसा? त्यांच्यासाठी आजपासूनच ही सारी खटपट कशी हे सारे घर त्यांचेच असते. इथेच राहून त्यांनी खावे, प्यावे _ आणि मजा करावी. यासाऱ्या घरामध्ये हिंडणे, फिरणे आणि खेळण्यापासून त्यांना कोणी अडवावे? परंतु मुलांनी गाणे कोठे म्हणावे? त्यांनी गोष्टी कोठे कराव्यात? त्यांनी कोठे खेळावे? त्यांना नाचावे, उड्या माराव्या वाटले तर त्यांनी कोठे नाचावे? आणि कोठे उड्या माराव्यात? मुले स्वयंपाक घरात जातात तेव्हा तेथे आईला त्रास वाटतो. आईची सर्व मुलाचे घरामधील स्थान कोणते ? 4 आई - वडिलांना / २९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now