लाइफ ऑफ़ आहिल्या चारी | LIFE OF AHILYA CHARI

Book Image : लाइफ ऑफ़ आहिल्या चारी  - LIFE OF AHILYA CHARI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शुगुफ्ता - SHUGUFTA

No Information available about शुगुफ्ता - SHUGUFTA

Add Infomation AboutSHUGUFTA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हीच ती संस्था जिथे १९५१ साली अहल्याजी प्रथम विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या. पाश्‍्चिमात्य-शिक्षण- तत्वज्ञानातील नाविन्याची आस लागल्याने फुलब्राईट शिष्यवृत्ती घेऊन दोन वर्षे अमेरिकेमध्ये वास्तव्य केल्यानंतर परतलेल्या अहल्याजी याच संस्थेत व्याख्यात्या म्हणून रूळल्या. जवळजवळ पुढची दोन दशके शिक्षकांच्या प्रशिक्षणांत त्या रमून गेल्या होत्या. शिक्षकाची भूमिका केवळ ज्ञानवाही अशी नसून मुलांच्या संपूर्ण जीवनाकडे लक्ष देत त्यांच्या सहभागातून शिक्षण देणारे वातावरण त्यांच्यासाठी निर्माण करणे हा या संस्थेचा आदर्श क्वचितच कुठे पहायला मिळेलसा. आज असे आदर्श ल्रुप्त झाले आहेत, बहुतेक महाविद्यालये बाजारू बनल्याचा अहल्याजींना खेद आहे. भारतीय कला अणि संस्कृतीच्या क्षेत्रात नवी दालने उघडलेली १९५० च्या दशकाने पाहिली. सृजनात्मक उर्जेचा स्त्रोतच वाहिला तिथे. कमलादेवी चट्टोपाध्याय आणि पुपुल जयकर यांसारख्या दिग्गज महिलांनी पारंपारिक कला, कारागिरी आणि वस्त्रोद्योगांना जणू नवजीवन दिले नि भारतात खेडोपाडी पसरलेल्या असामान्य कसबी कलाकार नि कारागिरांचा अभिमान पुन्हा जागला. १९६० चा आरंभ होता तो, अमेरिकन सरकारच्या आंतरराष्ट्रीय विकासखात्याच्या प्रतिनिधींचे (युएसएआयडी) चे शिष्टमंडळ कोलंबिया विद्यापिठाच्या शैक्षणिक सल्लागारांसह केंद्रीय शिक्षण संस्थानमध्ये आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) म्हणून पुढे नावारूपाला आलेल्या संस्थेच्या जन्माची शक्यता पडताळून पाहणे हा हेतू. औत्सुक्यापोटी अहल्याजी या कामगिरीवर बिनिच्या शिलेदार बनल्या. भारतातील शिक्षणविशवात एक नवे स्वप्न त्यांनी पाहिले. ते साकारण्यासाठीची त्यांची स्वत:ची नि त्यांच्या त्या काळच्या सहकाऱ्यांची अविश्रांत मेहनत बाईना आजही स्मरते. केंद्र आणि राज्यशासनाच्या समन्वयातून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्याचा, त्यासाठी एकत्र चालण्याचा तो काळ होता. एनसीईआरटी / एनआयई मध्ये अहल्याजी अभ्यासक्रम विभागाच्या प्रमुख होत्या. तिथे सर्व विषयांसाठीची पाठ्यपुस्तके त्यांनी बनवली. “मी आणि माझे सहकारी राज्याराज्यामधून गेलो. तिथल्या शिक्षण संचालकांच्या भेटी घेतल्या, नवा अभ्यासक्रम नव्या पाठ्यपुस्तकांतून शिकवण्याचा इष्टीकोन समजावला. शिक्षकांना प्रशिक्षण दिले. खडतर होती कामगिरी” बाई सांगतात. १९६२-६९ ही सात वर्षे अहल्याजी एनसीईआरटीच्या सेवेत होत्या. १९६१-६२ या वर्षी त्यांनी एडिंबरा विद्यापीठात उपयोजित भाषाविज्ञान या विषयाचे प्रशिक्षण घेतले. परतल्यावर एनसीईआरटीमध्ये “मातृभाषा-शिक्षण आणि इंग्रजी-शिक्षण” या प्रकल्पावर त्या कार्यरत होत्या. “पाठांतरावर भर असलेल्या भारतीय शिक्षणपद्धतीत वाचनाकडे दुर्लक्षच झालंय. मातृक्षाषा आणि इंग्रजी या दोन्हींसाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनकौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे जाऊन इतर विषय




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now